Akola
Akola 
विदर्भ

तोच गंध, तोच भाव आणि तीच ओढ 

विवेक मेतकर

व्हॅलेंटाईन डे 2019 : अकोला : वय तसं समजुतीचंच, कोण आपला, कोण परका याची पारख असलेल्या वयातच अंकिताला जसमितची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. बघता-बघता या प्रितीला सात वर्षे लोटली तरीही त्या प्रेमात अजूनही तोच गंध, तोच भाव आणि तीच ओढ दिसून येत आहे. 

पहला नशा पहला खुमार, असे मंतरलेले दिवस अनुभवलेले नाहीत असा अरसिक शोधूनही सापडणार नाही. अहो, अख्खं जग प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जीवावर तर तग धरून आहे.. जगातली सकारात्मकता प्रेमाच्या या अडीच अक्षरावरच तर टिकून आहे.. आपले पहिले प्रेम, पहिले प्रपोज, पहिली कमिटमेंट अशी न विसरणारीच असते.. आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने सात वर्षांआधी जुळलेल्या रेशीमगाठी त्यांच्या जीवनातील अलवार दिवस उलगडणारे होते. 

भुसावळ येथे राहणाऱ्या अंकिता छाबरा यांचा असाच परिचय झाला तो अकोल्यातील कुशल व्यावसायी जसमितसिंग ओबेरॉय यांच्याशी. जसमितसिंग यांचे भुसावळ हे आत्याचे गाव. दोघेही सिख कुटुंबातील आणि त्यातही जुने नाते. नात्यतच असल्याने ओळख झाली...भेट झाली...आणि मग...सुरू झाला संवाद. फेसबुकच्या माध्यमातून त्यांना आणखी जवळीक साधता आली. आजोबांच्या आजारपणामुळे अंकिताचे लग्न लवकर व्हावे, अशीच घरच्यांची इच्छा. मग दोघांनीही आपल्या घरी कळविलं आणि लगेच त्याला होकारही मिळाला. जसमितसिंग यांचा स्वभाव शांत, केअरींग, आई-वडीलांचा आज्ञाधारक आणि आपल्या कामाला प्राधान्य देणारा आहे. आणि महत्वाचं म्हणजे वाईट सवयींपासून दूर असल्याचे अंकिता सांगते. 

२०१२ साली लग्न झाले. तेव्हा असं वाटायचं की स्वभाव रागीट असेल. मात्र, शांत आणि संयमी स्वभावाने प्रत्येकाचे ते मन जिंकत असल्याचे अंकिता सांगते. दरम्यान, नातेवाईकांसह शेगावच्या आनंदसागर येथे पुन्हा भेट झाली. लग्नाचा बार उडाला. आज सात वर्षानंतरही त्यांच्या प्रेमात नात्यात आजही तोच गंध, तोच भाव आणि तीच ओढ दिसून येते. 

प्रेमातला एकमेकांमधला विश्वास, कमिटमेंट, एकमेकांचा आदर, सन्मान, आणि एकरूपता.. अधिक महत्त्वाची.. भले कालांतराने काही अडचणीने आल्या तरी तर त्याच्याविषयी, तिच्याविषयी वाटणारे प्रेम, आदर आणि आपुलकीची भावना दूर सारू नका. प्रेमात जय-पराजय, यश- अपयश असं काही नसतंच मुळी.. असते ती फक्त एक निखळ आत्मीयता.. हीच तर आयुष्यभर जपायची असते, असं ती सांगते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : लखनौची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT