destroyed Hiwarkhed primary health center 
विदर्भ

युवक रुग्णालयात आला अन्‌ उपचारासाठी भांडू लागला; थोड्या वेळाने बेसिनमध्ये थुंकला आणि...

सकाळवृत्तसेवा

अमरावती : ग्रामीण भागात आरोग्य सेवेची मोठी तफावत आहे. मोठे दवाखाने, चांगले डॉक्‍टर, चांगली आरोग्य सुविधेची मोठी समस्या आहे. अशात प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी वरदान ठरते. मात्र, येथेही योग्य उपचार होत नाही. कारण, चांगली आरोग्य सुविधा नाही. प्राथमिक उपचार करून रुग्णांना तालुक्‍याच्या ठिकाणी किंवा दुसरीकडे उपचरासाठी पाठविण्यात येते. मात्र, बुधवारी अमरावतीतील प्राथमिक आरोग्य केंद्र दुसऱ्याच कारणाने चांगलेच चर्चेत आले होते.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यात असलेल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निखिल गुडधे (वय 24) हा युवक उपचार करण्यासाठी आला. त्याने आल्या आल्या डॉक्‍टरांना तपासणी करण्याचा आग्रह केला. डॉक्‍टरांनी त्याला काहीवेळ थांबण्याची विनंती केली. मात्र, तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली देवघरे (वय 33) यांनी युवकाची तपासण्यास सुरुवात केली.

डॉक्‍टर तपासणी करणार येवढ्यात निखिल जवळ असलेल्या बेसिनमध्ये थुंकला. यामुळे डॉक्‍टर व परिचारिकांनी त्याला जाब विचारला. तुला समजत नाही का? असा प्रश्‍न त्यांनी केला. सर्वांसमोर डॉक्‍टर व परिचारिका आपल्यावर चिडल्यामुळे निखिल चवताळला. त्याने डॉक्‍टर व परिचारिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वस्तूंचीही फेकफाक केली.

काचा फोडल्या
निखिल गुडधे हा युवक प्राथमिक आरोग्य केंद्रात आला व माझा उपचार अगोदर करा अशी मागणी करू लागला. डॉक्‍टरांनी तुझा नंबर यायचा आहे, असे सांगून त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. यामुळे डॉक्‍टरांनी त्याची तपासणी सुरू केली. यानंतर त्याने बेसिनमध्ये थुंकून वाद घातला. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील काचा फोडल्या. यामुळे अन्य रुग्णांमध्ये व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशी तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी निखिलविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

निंदनीय बाब
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांवर आधीच अतिरिक्त ताण आहे. तरीही डॉक्‍टर रुग्णसेवेला प्राध्यान देत आहेत. अशात त्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. मात्र, आपल्या जिवाची परवा न करता ते आपले कार्य चोखपणे बजावत आहेत. तरीही डॉक्‍टरांसोबत असे व्यवहार होत असेल तर काय म्हणाव, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT