varakaris facing problems  
विदर्भ

वारकर्‍यांचा वाली कोण?

आशिष ठाकरे

बुलडाणा : राज्यात सध्या दुष्काळी सावट असताना मोठ्या प्रमाणावर उद्घाटनाचा सपाटा लावण्यात आला असून, या उद्घाटनात चक्क नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती दिसून येत आहे! पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या 33 कोटी रुपयांच्या यात्री निवास आणि कर्मचार्‍यांच्या सोईसाठी विश्रामगृहाचे आज (ता. 4) उद्घाटन होत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.

परंतु, यात मोठा प्रश्‍न आहे तो जिल्ह्यातून तब्बल 11 एस. टी. बसेस वारकर्‍यांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या असून, यावर तब्बल 7 लाखांचा खर्च झाला आहे. हा निधी आला कोठून याबाबत महामंडळाकडे कोणताही माहिती उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यात एकच चर्चेला उधाण आले आहे. 

पाठोपाठ राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून 33 कोटी रुपये खर्च करून यात्री निवास आणि बसस्थानक चंद्रभागानगर बसस्थानकाच्या जागेवर बांधले जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा उद्या (ता. 3) होणार आहे. यात्री निवासाच्या निर्मितीमुळे यात्रा काळात राज्य परिवहन महामंडळातील चालक व वाहकांच्या गैरसोय दूर होईलच. शिवाय यात्रेव्यतिरिक्त इतर वेळी सर्वसामान्य भाविक प्रवाशांना हक्काच्या निवासाची सोय होणार आहे. सदर कार्य हे निश्‍चित कौतुकास्पद आहे.

परंतु, शनिवारी (ता.2) जिल्ह्यात दिवसभर एकाएकी इतक्या मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने कसे जात असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. यावर चौकशी केली असता जिल्ह्यातील 7 आगारातून तब्बल 11 बसेसमधून वारकरी हे प्रासंगिक करारावर पंढरपूरसाठी उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविण्यासाठी गेले असल्याचे समोर आले. सदर प्रासंगिक करार हा थेट मुंबई येथून करण्यात आला असून, यासंदर्भात 2 मार्चला विभागीय कार्यालयाला पत्र प्राप्त झाले होते.

यात विशेष म्हणजे हा प्रासंगिक करार कुणी आणि कधी केला यासंदर्भात कुठलाही उल्लेख नसून, महाव्यवस्थापक (वाहतुक) यांच्या 27 फेब्रुवारीला दिलेल्या पत्रानुसार यासंदर्भातील नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, महामंडळात प्रासंगिक करार करावयाचा असल्यास कमीत कमी चार दिवसाअगोदर सर्व कागदपत्रांची आणि इतर सोपस्कार पूर्ण करण्याची गरज असते. याप्रकरणी सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले असून, वारकर्‍यांचा वाली कोण असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ उद्घाटनासाठी जिल्ह्यातून 11 बसेसद्वारे वारकर्‍यांना वेगवेगळ्या चर्चेला उधाण आणत आहे. 

असे आहे किलोमीटर व खर्च -

  • बुलडाणा आगार दोन बसेस
  • बुलडाणा ते पंढरपूर 862 कि.मी. खर्च 59 हजार 145, 
  • मोताळा ते पंढरपूर 994 कि.मी. खर्च 68 हजार 179
  • चिखली आगार दोन बसेस
  • चिखली ते पंढरपूर 816 कि. मी. खर्च 55 हजार 997
  • देऊळगावराजा ते पंढरपूर 816 कि. मी. खर्च 55 हजार 997
  • खामगाव आगार एक बस
  • खामगाव ते पंढरपूर 938 कि. मी. खर्च 64 हजार 347
  • मेहकर आगार दोन बसेस
  • मेहकर ते पंढरपूर 800 कि. मी. खर्च 54 हजार 902
  • सिंदखेडराजा ते पंढरपूर 890 कि. मी. 61 हजार 62
  • मलकापूर आगार एक बस
  • मलकापूर ते पंढरपूर 956 कि. मी. 65 हजार 579
  • जळगाव जामोद दोन बसेस
  • नांदुरा ते पंढरपूर 1030 कि. मी. 71 हजार 328
  • संग्रामपूर ते पंढरपूर 1120 कि. मी. 76 हजार 803
  • शेगाव आगार एक बस
  • शेगाव ते पंढरपूर 1010 कि. मी. 69 हजार 274

महामंडळाकडे केला भरणा - सदर प्रासंगिक करार करताना 7 लाख 72 हजार 874 रुपये इतके देयक होणार असून, त्यापैकी 7 लाख 73 हजार रुपये भरणा केलेला असल्याचे मागणीपत्रात म्हटले आहे परंतु, तो भरणा कोणी आणि कधी केला याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसल्यामुळे वेगवेगळे प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

मध्यवर्ती कार्यालयाकडून पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी प्रासंगिक करारानुसार 11 बसेस मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कार्यवाही करत बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु, सदर रक्कमेचा भरणा कुणी आणि कोठे केला याबाबत काही सांगता येणार नाही. - संदीप रायलवार, विभागीय व्यवस्थापक, बुलडाणा. 

परिवहन विभागावर मदार- उद्घाटनाला जास्तीत जास्त वारकरी उपस्थित राहावे यासाठी परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 7 आगारातून 11 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्याची चर्चा असून, या भरण्यासंदर्भात एस.  टी. महामंडळातील सत्तेत असलेल्या एका संघटनेला हाताशी धरल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT