akola jail
akola jail 
विदर्भ

बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला अन्नछत्रांसाठी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संचारबंदीच्या काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना अन्न देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरु आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे. या व अशा विविध घटकांची सांगड घालून जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श नमूना निर्माण केला आहे. 

जिल्ह्यात सध्या 25 हून अधिक आश्रयगृहे तर तितकीच कम्युनिटी किचन्स सुरु आहेत. त्यांना दररोज किमान 15 ते 20 हजार लोकांना अन्न द्यावे लागते. त्यासाठी भाजीपाला अन्न-धान्य उपलब्ध करावे लागते. त्यासाठी महसूल विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग असे विविध विभाग मिळून काम करीत आहेत. याठिकाणी लागणारी भाजीपाल्याची गरज ओळखून कारागृह अधीक्षक ए.एस. सदाफुले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विनंती केली व बंदीजनांनी पिकवलेला हा भाजीपाला शासकीय दराने कम्युनिटी किचनसाठी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार हा भाजीपाला आता कम्युनिटी किचनला दिला जात आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळण्यास मदत सुद्धा होत आहे. 


14 एकर जमिनीत पिकवली शेती
अकोला कारागृहाकडे 14 एकर जमीन आहे. ही जमीन तीन विहीरींच्या पाण्यामुळे ओलिताखाली आहे. परिश्रम करणारे 402 बंदीजन, व्यवस्थापन करणारा कारागृह कर्मचारीवृंद याबळावर इथं शेती पिकवली जाते. इथं गहू, सोयाबीन, तूर यासारखी धान्ये कडधान्ये, मोहरी सारखे गळीत धान्य, शिवाय बीट, नवलकोल, आंबटचुका, कढीपत्ता, कोथिंबीर,  मुळा, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, पत्ताकोबी, गोल भोपळा, दुधी भोपळा, पालक, वांगे, भेंडी,  असा हरप्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. याशिवाय इथं असलेले सहा बैल, सहा गायी, पाच वासरू यांना लागणारा चारा ही पिकवला जातो. शिवाय जनावरांचे शेणखत. त्यातून सेंद्रिय पद्धतीने हा सर्व भाजीपाला तयार केला जातोय. 


शेतीतून घेतले सात लाखांचे उत्पन्न
कारागृहातील शेतीतून तुरुंग प्रशासनाने आतापर्यंत 71 हजार 907 किलो उत्पन्न घेतले आहे. त्याचे रुपयातील मूल्य सात लाख 24 हजार 541 रुपये इतके आहे, हे मार्च अखेरचे उत्पादन आहे. हा भाजीपाला विक्री करताना तो शासकीय दराने विकला जातो. हा दर बाजारभावापेक्षा निश्चितच स्वस्त असतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT