file photo 
विदर्भ

धान्याच्या शेडवर भाजीविक्रेत्यांचा ताबा; वाढल्या या समस्या

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कोरोना संसर्गाच्या काळात बजाज चौक येथील भाजीबाजारात होत असलेली गर्दी टाळण्याकरिता येथील मुख्य भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हलविण्यात आला. यामुळे येथील शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवणे आणि लिलाव करण्याच्या शेडचा ताबा सध्या येथील आलू, कांदे विक्रेत्यांकडून घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवणे आणि त्याचा लिलाव करण्यासाठी बाजार समितीला मोठी अडचण होत आहे.

पावसाचे संकेत मिळत आहेत. या काळात शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांसह बाजार समितीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मध्यंतरी आलेल्या पावसात बाजार समितीत उघड्यावर असलेला शेतमाल ओला झाला होता. यात शेतकऱ्यांसह अनेक व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. सध्या बाजार समितीच्या जुन्या शेडवर व्यापाऱ्याचा, शेतकऱ्यांचा नाही तर आलू, कांदे विक्रेत्यांचा ताबा आहे. 
 

या प्रकारामुळे शेतक्‍यांची अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहारही केला आहे. तात्पुरत्या स्वरूपात असलेली ही व्यवस्था आता त्रासाची ठरत असल्याने ही समस्या मार्गी काढण्यासाठी भाजीबाजार येथून हलविण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. यावर जिल्हा प्रशासन कार्य निर्णय घेते यावर बाजार समितीची व्यवस्था अवलंबून आहे. 

कोरोनाचे सावट कायम 
जिल्ह्यात कोरोनाचे सावट कायम असून जिल्हा प्रशासनाकडून गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे येत्या दिवसात यावर तोडगा निघणे सध्या तरी अडचणीचे दिसत आहे. हा भाजीबाजार बजाज चौक परिसरात गेल्यास तिथे असलेल्या अरुंद जागेमुळे गर्दी होऊन या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे बाजार समिततीसमोर असलेल्या अडचणी तशाच कायम राहणार राहण्याची शक्‍यता आहे. 

तात्पुरती व्यवस्था ठरतेय अडचणीची 
गर्दी टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, ही तात्पुरती व्यवस्था वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीकरिता डोकेदुखी ठरत आहे. याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. 


ही समस्या मार्गी काढण्याकरिता समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. हा बाजार येथून हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसे होत नसल्यास शेतक्‍यांचा येणारा धान्यसाठा ठेवण्याकरिता पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 
-समीर पेंडके, 
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT