truck 
विदर्भ

त्या वाहनात भरून होते 40 कट्टे; अन्‌ अडकला जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा)  : रेशन दुकानातील धान्य वाहनात भरून मध्यप्रदेशात जात असल्याची गोपनीय माहिती भ्रमणध्वनीवरून मिळाली. त्यानंतर पुरवठा विभागाने तातडीने सापळा रचून तांदळाचे 40 कट्टे व वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (ता.22) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. 

नायब तहसीलदारांना आला फोन 

नायब तहसीलदार विनायक मगर यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनी करून एम.एच.40 ए.के. 5042 क्रमांकाच्या वाहनातून धान्याची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती दिली. मगर यांनी लगेच पुरवठा विभागाला याबाबत कळविले. पुरवठा निरीक्षक अमोल पाटील व लिपिक मदन भालकर यांनी वर्धा मार्गावरील लाठीवाला पेट्रोलपंपाजवळ बेमालूमपणे सापळा रचून वाहन अडविले. 

17 क्विंटल तांदूळ व वाहन ताब्यात

वाहनाची तपासणी केली असता वाहनात धान्य असल्याची शहानिशा करून ताब्यात घेतले. तसेच तहसील कार्यालयात आणून पंचनामा केला. संबंधित वाहनातील 40 कट्ट्यांमध्ये भरलेले सुमारे 17 क्विंटल तांदूळ व वाहन ताब्यात घेऊन चालकाची विचारपूस केली. वाहनचालक उमेश धुर्वे याने, संजय देवचंद गोमासे यांच्याकडून पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथील हिमांशू ट्रेडर्स येथे धान्य घेऊन जात असल्याची माहिती दिली. बातमी लिहीपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

तहसीलदारांच्या सूचनेप्रमाणे होणार कारवाई 

धान्यासह वाहन ताब्यात घेतले असून वाहनचालक व मालविक्रेत्यांची चौकशी सुरू असून अहवाल येथील तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्याकडे देणार आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा निरीक्षक अमोल पाटील यांनी दिली. 

पडीक धान्य विक्रीकरिता पाठवीत होतो...

माझा धान्य खरेदी-विक्रीचा धंदा असून माझे हनुमान वॉर्डामध्ये दुकान आहे. तसेच मी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक आहे. माझ्या दुकानात अनेक दिवसांपासून न खपलेला तांदूळ पडून होता, तो माल पांढुर्णा येथे विक्रीकरिता पाठवीत होतो. मात्र, पुरवठा निरीक्षकांनी चुकीच्या माहितीवरून माझा माल व वाहन ताब्यात घेतले, अशी माहिती धान्याचे मालक संजय देवचंद गोमासे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

SCROLL FOR NEXT