Vena River Basin sakal
विदर्भ

Vena River Basin : वेणा नदीपात्र बनतेय 'डंपिंग स्पॉट'

वेणा नदीच्या पात्रात सध्या कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे. त्यामुळे ही नदी आहे की डंपिंग स्पॉट आहे, असा प्रश्न पडला आहे.

रवींद्र कुंभारे

वेणा नदीच्या पात्रात सध्या कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे. त्यामुळे ही नदी आहे की डंपिंग स्पॉट आहे, असा प्रश्न पडला आहे.

गुमगाव - वेणा नदीच्या पात्रात सध्या कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे. त्यामुळे ही नदी आहे की डंपिंग स्पॉट आहे, असा प्रश्न पडला आहे. सरकार या नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हिंगणा तालुक्यातील सर्वांत मोठ्या गावांमध्ये गुमगावचे नाव घेतले जाते. गावाच्या बाहेरून वेणा नदी डौलात वाहत असते. गुमगावला लाभलेले वरदान म्हणून वेणा नदीकडे बघितले जाते. गुमगावसह परिसरातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या वेणा नदीचे पात्र मात्र सध्या हळूहळू अस्वच्छतेच्या गर्तेत जात आहे.

नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले असल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे. स्वच्छता अभियानात गाव स्वच्छ होत असताना गावातील काही कचरा नित्यनेमाने वेणा नदी पात्रात येऊन पडत आहे. अस्वच्छतेमुळे नदी पात्राला आलेली अवकळा बघता पात्र स्वच्छ करून नदीचे सौंदर्य वाढविणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अशुद्ध परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात. हे लक्षात घेऊन शासनाने संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली.त्याचा सकारात्मक परिणाम गावात आता दिसायला लागलेला आहे. परंतु गावातील काही नागरिक घरातील कचरा, निर्माल्याचे साहित्य नित्यनेमाने गुमगाव-कोतेवाडा भागातून वाहणाऱ्या वेणा नदी पात्रात आणून टाकत असल्याचे दररोजच पाहायला मिळत आहे.

वेणा नदीच्या पात्रात सध्या टाकाऊ पदार्थ, काचेच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या पिशव्या,उरलेले आणि खराब अन्न, भाजीपाला, दुकानातील टाकाऊ वस्तू आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने लवकरच नदी पात्राला चक्क कचरा घराचे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली आहे.

परिसरात कचऱ्याची दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली आहे. नदीच्या पात्रात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या अस्वच्छतेला नागरिकांची बेपर्वा वृत्ती आणि स्थानिक प्रशासनाची अनास्था कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर

अनेक संतांचा पदस्पर्श व आशीर्वाद गुमगावनगरीला लाभलेला आहे. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज व संत जागेश्वर महाराजांचा सहवास लाभल्याने ही भूमी पावन झाली आहे. त्यामुळे गावाला संतनगरी म्हणून परिसरामध्ये ओळखल्या जाते. ज्या गाडगे महाराजांनी गावाला स्वच्छतेचा संदेश दिला, त्याच गावातील वेणा नदीच्या पात्रामध्ये स्वच्छतेची बोंबाबोंब दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनो, तुमचा वेणा मायच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणावर भरोसा नाही का? असे म्हणण्याची वेळ पर्यावरणप्रेमींवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT