file photo 
विदर्भ

सोशल मीडियामुळे संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर; निमंत्रण पत्रिका, शुभेच्छा पत्रांचा विसर

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : सण, उत्सव, वाढदिवस, थोर पुरुषांच्या पुण्यतिथी, जयंत्या, अभिनंदन, आभार निमंत्रण यांच्यासह लग्नपत्रिका, मरण पावलेल्या व्यक्तीची कार्यक्रमाची पत्रिका अशा विविध प्रकारच्या आमंत्रण पत्रिका तथा शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने थेट संवाद होत नसल्याने त्याचे समाजमनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मोबाईलवरच सुंदर दिसणाऱ्या विविध प्रकारच्या इमेज तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. सणासुदीला तर सकाळपासून किंवा आदल्या दिवसापासूनच अभिनंदनाचा वर्षाव केला जातो. त्यामुळे मणसामाणसांतील थेट संवाद हरवला आहे.

प्रत्येकाच्या मोबाईलमधील फेसबुक, व्हॉट्‌सॲपचा चॅटबॉक्‍स शुभेच्छांनी पूर्ण भरून जात असल्याचे सांगण्यात येते. मोबाईलमध्ये आलेल्या क्रांतीमुळे युवक युवतींकडून व्हॉट्‌सॲपचा माध्यमातून विविध प्रकारच्या नवनवीन इमेजेस तयार करून एकमेकांना पाठविले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात भेटून अभिनंदन तथा शुभेच्छा देण्याची परंपरा संपत असल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येत आहे. याबाबत तालुक्‍यातील काही तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी मोकळ्या मनाने प्रतिक्रिया दिल्या.

नाते संपण्याचा धोका
सोशल मीडियाच्या युगात थोडीफार संस्कृती ग्रामीण भागात शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. मात्र शहरात तर लुप्त होण्यातच जमा आहे. शहरात सण, उत्सव नावापुरते साजरे केले जातात. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नाते संपत चालले आहे.
- अविनाश चुडाह, परतवाडा.


स्वतःच घ्यावा निर्णय
व्यस्त जीवनात सोशल मीडियाचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. तेवढाच घातकही ठरत आहे. आज फक्त फायदा पाहण्यात येतो, कोणीही नुकसान काय होत आहे, याची पर्वा करत नाही. यासाठी स्वतःच निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
- ओम घाटे, अचलपूर


भेटीगाठी झाल्या बंद
दहा पंधरा वर्षापूर्वी मित्र असो की, नातेवाईक कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा, अभिनंदन भेटल्यावरच द्यायच्या. आता मात्र प्रत्यक्षात न भेटता सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. या प्रकारामुळे आपली संस्कृती लोप पावत चालली आहे.
- अनिकेत गिऱ्हे, कांडली.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT