मूल (जि. चंद्रपूर) : निपचित पडून असलेल्या वाघाने गस्तीवर असलेल्या विशेष पथकावर अचानक हल्ला (tiger attack on special forest squad) चढवला. यात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी झाले. रवी खोब्रागडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या दोन्ही पायाची बोटे गंभीररित्या जखमी झाली. ही घटना मूल (mool chandrapur) बफर झोन अंतर्गत येणाऱ्या डोणी गावालगतच्या जंगलात गुरूवार (ता. 3) घडली. पथकावरच वाघाने हल्ला चढविल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाघाच्या वाढत्या हल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. (veterinary doctor injured in tiger attack at mool of chandrapur)
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात असणाऱ्या वाघ आणि बिबट हे संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यास अशा प्राण्यांवर पाळत ठेवण्यात यावी, अशी सूचना वनविभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील डोणी गावालगतच्या जंगलात एक वाघ निपचित अवस्थेत पडून असल्याची माहिती पथकाला मिळाली. मागील काही दिवसांपासून ताडोबा येथील प्रकल्पाचे पथक या वाघावर पाळत ठेवून होते. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान वाघाची प्रत्यक्ष स्थिती बघण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पथक गेले. तेव्हा वाघाने अचानक हल्ला चढवला. स्वतःचा बचाव करताना खोब्रागडे खाली पडले. तेव्हा वाघाने त्यांचे दोन्ही पाय पकडले. तोंडाने एका पायावर हल्ला चढविला, तर दुसरा पाय त्याने पंजामध्ये पकडला. पायात मजबूत बूट असतानादेखील जबड्यात बोटे सापडले. त्यात खोब्रागडे यांच्या पायाचे एक बोट तुटले, तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सोबतच्या पथकाच्या लोकांनी जोरदार आरडाओरडा केल्यावर वाघाने पळ काढला. दरम्यान, जखमी डॉक्टरला शस्त्रक्रियेसाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे. या घटनेला मूल येथील बफर झोनच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, पथकावरच वाघाने हल्ला चढविल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.