चंद्रपूर : अपघातात आजी ठार; तर नातू गंभीर sakal
विदर्भ

चंद्रपूर : अपघातात आजी ठार; तर नातू गंभीर

ही घटना रविवार (ता. १०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

नागभीड (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील सावरगाव येथील इसार पेट्रोल पंप जवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात आजी ठार तर नातू गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार (ता. १०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. मृत आजीचे नाव पुष्पा फुलचंद ठिकरे, (वय ६५, रा. सावरगाव) तर जखमी नातवाचे नाव लोकेश अरुण बोरकर, (वय २१, रा. वैजापूर) असे आहे.

लोकेश बोरकर हा आजी पुष्पा फुलचंद ठिकरे हीला दुचाकीवर घेऊन चंद्रपूर-नागपूर हायवे वरून तळोधीच्या दिशेने जात होता. याचदरम्‍यान समोरून विरुद्ध दिशेने दुचाकी येत होती. सावरगाव जवळ असलेल्‍या पेट्रोल पंपासमोर या दोन्‍हीही वाहनांची आमने-सामने धडक झाली.

यात पुष्पा फुलचंद ठिकरे ह्या जागीच ठार झाल्‍या. तर तिचा नातू लोकेश अरुण बोरकर हा गंभीर जखमी झाला. जखमीला ब्रह्मपुरी येथे तातडीने हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे, ए.एस.आय. भानारकर, दिलीप चौधरी, सुरेश आत्राम यांनी घटनास्‍थळी भेट दिली. अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT