अतिवृष्टीने २५ लाख हेक्टरवरील क्षेत्र बाधित
अतिवृष्टीने २५ लाख हेक्टरवरील क्षेत्र बाधित sakal
विदर्भ

विदर्भात पाच लाख हेक्टरवरील पीक अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. अजूनही पावसाचा धोका आहेच. संततधार पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले. ओढे, नाले, नदीकाठच्या जमिनी चिभडल्या. त्याचा परिणाम तब्बल पाच लाख हेक्टरवर दिसून येत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने दीड लाखांवर तर संततधार पावसाने साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत दमदार पाऊस झालेला आहे. सप्टेंबर महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर संकटाचे ढग कायम असून, पावसाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टी झालेल्या भागांत जमिनी खरडून गेलेल्या आहेत.

शेतरस्ते बंद झालेले आहेत. त्यामुळे शेतमाल वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस थांबला नाही तर नुकसानाच्या प्रमाणात आणखीन वाढ होऊ शकते. कृषी विभागाच्या अहवालानुसार अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. याचे पंचनामे सुरू आहेत. संततधार पावसाने यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या पावसाने जवळपास साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

असे असले तरी संततधार पावसाने झालेल्या नुकसानाबाबत अद्याप शासनाचे आदेश नाहीत. त्यामुळे या क्षेत्राचे पंचनामे अजूनही झालेले नाही. अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने खरिप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. कृषी विभाग, विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पीक नुकसानीची पाहणी करून पीकविमा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीनसह तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यानंतर ज्वारी, उडीद आदी पिकांचा क्रम लागतो. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन व कापूस या पिकांना बसला आहे. शेंगांना झाडावरच कोंब फुटत आहेत. कपाशीचे पीक वाकले असून, बोंडे काळी पडत आहेत. अनेक तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे.

एक लाख हेक्टरवरील कापसाला फटका

जिल्ह्यात अतिवृष्टीने कहरच केला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर त्यांचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सर्वच शेतकर्‍यांना बसला. तब्बल एक लाख हेक्टरवरील कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. 45 हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित झाले आहे. त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यात पीकविमा काढलेल्या जवळपास 88 हजार शेतकर्‍यांनी नुकसानाच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यातील 40 टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण विमा कपंनी तसेच कृषी विभागाने केले असून अजूनही 60 टक्के क्षेत्रावरील पिकांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. कृषी विभाग तसेच विमा कपंनीच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT