विदर्भ

Vidarbha Agriculture : विदर्भात शेती करणारी पहिली मानव वसाहत सापडली; पुरातत्त्व अभ्यासक डॉ. नरांजेंचे संशोधन

उमरेड तालुक्यातील कोहळा गावाजवळ विदर्भात पहिली शेती करणाऱ्या मानव वसाहतीचे पुरावे सापडले आहे.

राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

उमरेड तालुक्यातील कोहळा गावाजवळ विदर्भात पहिली शेती करणाऱ्या मानव वसाहतीचे पुरावे सापडले आहे.

नागपूर - उमरेड तालुक्यातील कोहळा गावाजवळ विदर्भात पहिली शेती करणाऱ्या मानव वसाहतीचे पुरावे सापडले आहे. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे हे पुरावे पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक डॉ. मनोहर नरांजे यांनी शोधून काढले असून यावर आता संशोधन केले जाणार आहे. येथे आढळून आलेली शिळा वर्तुळे दफनभूमी असून उत्खनन केल्यास जुना वारसा पुढे येण्याची शक्यता आहे.

उमरेडपासून ३५ तर बेला गावापासून सहा किमी अंतरावर असलेले कोहळा गाव महिनाभरापूर्वी डॉ. मनोहर नरांजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले. पाचशे लोकसंख्येचे हे गाव वडगाव धरणामागील बाजूस जुन्या अवशेषावरच वसले आहे. जंगलाला लागून असलेल्या या गावाजवळ ५ ते १५ मीटर घेर असलेले शिळा वर्तुळ आढळून आले. शिळा वर्तुळ अर्थात दगडांचा गोल घेरा करून तयार केलेली दफनविधीची जागा. कोहळा जवळच्या शिळा वर्तुळांच्या निर्मितीसाठी परिसरात उपलब्ध असलेला काळा पाषाण वापरला आहे. असे शिळा वर्तुळ मोठ्या प्रमाणात असल्याचे डॉ. नरांजे यांनी नमुद केले. परंतु वसाहतीचे स्थान दुर्मिळ आहेत.

अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे मानवी वसाहत स्थान आतापर्यंत नऊ ठिकाणी आढळून आले. कोहळा गावातील वसाहत स्थान हे दहावे असल्याचे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. ही सर्व शिळा वर्तुळे त्या काळातील माणसांच्या कबरी असून तिथे पुरातत्त्व विभागाने उत्खनन केल्यास त्या काळातील समृद्ध सांस्कृतिक वारसा समोर येऊ शकतो असे डॉ. नरांजे यांनी नमूद केले. कोहळा गावाच्या दुसऱ्या बाजूला शेत शिवारामध्ये सातवाहन आणि वाकाटक काळातील अनेक अवशेषही सापडले आहे. त्यामध्ये मातीच्या विटा, पाटा वरवंट्याचे तुकडे, शिवलिंग आणि नंदी तसेच काही मूर्तींचे भग्न तुकडे आढळल्याने या संपूर्ण परिसरात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी मानवी वसाहत होतीच, शिवाय त्यावेळी ते लोक समृद्ध शेती तसेच खनिजांचे उत्खनन ही करत होते, असेही डॉ. नरांजे यांनी सांगितले.

अभ्यासानंतरचे निष्कर्ष

  • परिसरात मोठ्या प्रमाणातील शिळावर्तुळांमुळे येथे बऱ्याच मोठ्या संख्येत महापाषायुगीन लोकांचे दीर्घकाळ वास्तव्य.

  • शिळा वर्तुळात उत्खनन केल्यास अनेक अवजारे, मातीची भांडी व मृत व्यक्तीशी संबंधित इतर वस्तू बाहेर येण्याची शक्यता.

  • अडीच ते हजार वर्षांपूर्वीच्या लोकांनी लोखंडाचा उपयोग केलाच, शिवाय त्यांनी लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची पद्धतीही विकसित केली.

कोहळा गावाजवळ विदर्भातील पहिली शेती करणाऱ्यांची वसाहत होती. अशा वसाहती अल्प आहे. ही दहावी वसाहत असेल. विदर्भातील खास करून उमरेड आणि आजूबाजूच्या परिसरातील खनिज संपत्तीचे ज्ञान अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच तिथे वसाहत करून राहत असलेल्या मानवाला असावे.

- डॉ. मनोहर नरांजे, पुरातनशास्त्राचे अभ्यासक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT