In Vidarbha both committed suicide and one was tortured 
विदर्भ

लग्नाच्या अठराव्या दिवशी पत्नीने दिला जेवणाचा डब्बा; सायंकाळी घरी परतल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीनच सरकली

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : एक ते दोन भेटीमध्ये घट्ट मैत्री आणि नंतर प्रेम आता हे काही नवीन राहिलेले नाही. दोन दिवसांच्या प्रेमासाठी घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्यांची कमी नाही. प्रेमाच्या आनाभाका घेत घरच्यांना विरोध झंगारून लग्न करायचे आणि काही दिवसात वेगळे व्हायचे हे प्रमाण आता वाढत चालले आहे. प्रेम भंग झाल्यामुळे अनेकजण मृत्यूला कवटाळतात. विवाहाच्या काही दिवसातच आत्महत्या केल्याच्‍या अनेक घटना आपण वृत्तपत्रात वाचतो. आशाच दोन घटना विदर्भात घडल्या आहेत.

नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील वडेगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत पांडुटोला येथील आदेश घाटघुमर या युवकाचे गोंदिया जिल्ह्यातील पिंडकेपार येथील तोमेश्‍वरीशी २४ फेब्रुवारीला लग्न झाले. ८ मार्चला तोमेश्‍वरीच्या माहेरी भाच्याचा वाढदिवस होता. त्यासाठी पती-पत्नी दुचाकीने पिंडकेपारला जाऊन आले. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तोमेश्‍वरीने पती आदेशला जेवण दिले आणि सोबत दुपारच्या जेवणाचा डबाही दिला. डबा घेऊन आदेश शहरात इमारतीच्या रंगरंगोटीच्या कामावर निघून गेला. याच दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास तोमेश्‍वरीच्या नाकातोंडातून फेस येऊ लागला. कुटुंबीयांनी तिला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यांच्या लग्नाला केवळ अठरा दिवस झाले होते.

प्रेमविवाहाचा करुण अंत

कीर्ती आकाश गायकवाड (वय २५, रा. जुनी मंगळवारी, पारडी) हिने २१ महिन्यांपूर्वी आकाश गायकवाड याच्याशी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर कीर्ती पतीसह शिवक्तीनगर येथे किरायाच्या खोलीत राहत होती. आकाशचे आई-वडीलही शिवशक्तीनगर परिसरात राहायचे. कीर्ती ही सक्करदरा येथील एका कापडाच्या दुकानात कामाला जायची, तर आकाश सुतारकाम करायचा. मात्र, शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कीर्तीने घरी खिडकीला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. फिर्यादी अजय गौतम झिल्पे यांनी दिलेल्या सूचनेवरून पारडी पोलिसांनी सद्यःस्थितीत आकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास सुरू आहे. 

तरुणीवर दोघांचा बलात्कार

कामाच्या शोधात नागपुरात आलेल्या तरुणीवर दोघांनी बलात्कार केला. याप्रकरणी महिलेसह तिघांवर अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली. अनिता कुसराम (४२) आणि राजकुमार रमेश मरकाम (२०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पीडित  २० वर्षीय तरुणी मध्य प्रदेशातील मंडला येथे राहते. अनितादेखील तेथेच राहते. एकाच गावातील असल्याने त्यांच्यात ओळख होती. २१ डिसेंबर२०२० रोजी अनिताने तिला कामासाठी नागपूरला आणले. आरोपी हे एलआयटी कॉलेज येथील बांधकामावर कामाला होते. आरोपींनी पीडित तरुणीलादेखील त्याच बांधकामावर कामाला लावले.

दरम्यान, अनिताने पीडित तरुणीला गिरधारी रहांगडाले (४३) आणि राजकुमार मरकाम यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले. तिने नकार दिला. त्यामुळे दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. ही माहिती कुणाला सांगितल्यास तरुणीला तिघांनीही जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने रविवारी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अनिता आणि राजकुमार यांना अटक केली. गिरधारी फरार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT