Vidarbha farmers are waiting for purchase of onion by government 
विदर्भ

विदर्भातील कांदा अजूनही वेटिंगवरच,शेतकरी नाराज

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : राज्य सरकारने 50 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली असली तरी त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती विभागात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते व सध्या लॉकडाऊनचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

नाशिक विभागातील कांदा लॉकडाऊनमुळे पडून राहत असून तो खराब होऊ लागल्याने या भागातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे खंत व्यक्त केली. मुंबई व पुण्याकडे या भागातील कांद्याची विक्री मोठ्या संख्येने होत असून तो परदेशातही निर्यात होतो. सध्या कोरोना संकटामुळे कांदा निर्यात बंद असतानाच बाजार समित्या बंद असल्याने कांदा विकायचा कुठे? असा प्रश्‍न होता. त्यावर राज्य सरकारने नाशिक विभागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. तब्बल 50 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. कांदा खरेदीचे आदेश बाजार समित्यांना दिले गेले आहेत.
विदर्भातही कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कोरोनाचे संकट या भागातही आहे. विभागात अमरावती जिल्ह्यात कांदा उत्पादकांची संख्या तुलनेने अधिक असून जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. त्यामुळे विक्रीचा पेच आहे. नाशिकप्रमाणे या भागातील शेतकऱ्यांचाही कांदा विकत घेण्याची मागणी त्यामुळे जोर धरू लागली आहे.
आदेश नाहीत
राज्य सरकारने कांदा खरेदी करण्याचे आदेश येथील बाजार समित्यांना दिलेले नाहीत. सध्या कोरोना संक्रमणाची स्थिती अमरावतीत गंभीर असल्याने फळ व भाजीपाला बाजार बंद आहे. आदेश मिळाल्यास खरेदी सुरू करता येईल, असे बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT