विदर्भ

धनवटे रंगमंदिर नामकरणाला काहींची पसंती, तर काहींचा विरोध 

राघवेंद्र टोकेकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धनवटे रंगमंदिराच्या जागी बांधण्यात आलेल्या नूतन वास्तूचे नाव सूचवा असे आवाहन वि. सा. संघाने केले अन्‌ उभे आयुष्य धनवटेच्या रंगभूमीवर घालवलेल्या रंगकर्मींच्या आठवणी जाग्या झाल्या. काहींनी "रंगशारदा'ला मूकसंमती दिली. काहींनी बाबूराव धनवटे यांच्याच नावाचा आग्रह धरला. तर, काहींनी "नाना जोग स्मृती रंगमंदिर' असे नाव ठेवण्याची मागणी केली. 

विदर्भ साहित्य संघातील रंगमंदिरासाठी नाव सूचवा, असे आवाहन वि. सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी केले आहे. "रंगशारदा' असे नाव त्यांनी सुचवले असून, हा अंतिम पर्याय नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात काहींनी नाट्यांजन, नाट्यप्रासाद, नाट्यलहरी, नाट्यसारा व रंगप्रभा अशी नावेदेखील सूचविली आहेत. 

ज्येष्ठ नेपथ्यकार गणेश नायडू म्हणाले, श्रीमंत बाबूराव धनवटे रंगमंदिर जागतिक दर्जाचे असावे याचा अभ्यास करूनच नाना जोग यांनी ते बांधले होते. तो रंगमंच पूर्णत: शास्त्रशुद्ध होता. तरीही केवळ पंधरा हजार रोख आणि बांधकामाचे साहित्य पुरविले म्हणून रंगमंदिराला श्रीमंत बाबूराव धनवटे नाव देण्यात आले. या कार्यात नाना जोग यांनी अपार कष्ट केले. त्यांचे स्मरण कधी व कसे होणार? असा प्रश्‍न असल्याचे गणेश नायडू म्हणाले. 

श्रीमंत बाबूराव धनवटे रंगमंदिर उपराजधानीची सांस्कृतिक ओळख होती. ती तशीच राहावी असे त्याकाळचे डेकोरेटर भागवत तिवारी म्हणाले. ज्येष्ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांनी मनोहर म्हैसाळकर यांच्या "रंगशारदा' पर्यायाचे स्वागत केले. तर नूतन रंगमंदिर नवोदितांचे भवितव्य सुधारेल यात शंका नाही. 

बाबूराव धनवटे रंगमंदिराने त्याकाळी सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ते सुणर्वपर्व होतेच. पण आता नाव बदलण्यास हरकत नसल्याचे ज्येष्ठ नाट्यकर्मी मधू जोशी म्हणाले. आम्ही जिथे घडलो, वाढलो अन्‌ नावारूपाला आलो ते रंगमंदिर बाबूराव धनवटे यांच्याच नावाने रसिक प्रेक्षकांसमोर यावे अशी इच्छा रंगकर्मी महेश रायपूरकर यांनी व्यक्‍त केली. 

बालनाट्याने मला घडवले

धनवटेच्या रंगभूमीवर होणाऱ्या बालनाट्याने मला घडवले. नाव बदलण्यात काहीच वावगे नसल्याचे रंगकर्मी प्रभाकर आंबोणे म्हणाले. वयाच्या 69 व्या वर्षी मला अमलदार करण्याचे भाग्य मिळाले. पूर्वी व्यावसायिक नाटक सादर करताना वाटणारा उत्साह अंमलदारच्या वेळी कायम होता, असे आंबोणे म्हणाले. तर धनवटे रंगमंदिर शहराच्या कलासंस्कृतीची ओळख होती. रंगशारदा मुंबईत आहे. त्यामुळे या रंगमंदिराचे नाव बाबूराव धनवटे असेच असावे, असे अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे नरेश गडेकर म्हणाले. 

नाव "नाना जोग स्मृती रंगमंदिर' असावे 

धनवटे रंगमंदिराच्या निर्मितीत नाना जोग यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे योगदान विसरता येणार नाही. धनवटे रंगमंदिर निर्माण व्हावे यासाठी त्यांची तगमग होती. स्वत:चे घर सोडून त्यांनी लोहकुटीत अखेरचे आयुष्य घालवले. नाट्य क्षेत्रातील त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे यासाठी रंगमंदिराचे नाव "नाना जोग स्मृती रंगमंदिर' नाव ठेवावे. "देशपांडे', "भट' यांच्याप्रमाणे वैदर्भीय रसिक "नाना जोग' यांनादेखील स्मरणात ठेवेल, असा विश्‍वास ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद वसुले यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT