vidarbha nagpur mental hospital training
vidarbha nagpur mental hospital training 
विदर्भ

मनोरुग्णालयात झाडू बनवण्याच्या प्रशिक्षणातून त्यांच्या आयुष्याला येत आहे आकार

केवल जीवनतारे ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः तिचे नाव ज्योती. ती संगीता, ती मनोरमा... अशा साऱ्या जणी...कुठून आल्या ठाऊक नाही. घरचा पत्ता ठाऊक नाही. रेल्वे, बसस्थानक किंवा रस्त्यावर बेवारस फिरताना पोलिसांनी आणले. मनोरुग्णालयात उपचारासह मुक्कामाला आल्या. प्रत्येकीच्या आयुष्याची कथा दुःखाने माखलेली. आपल्याच विश्‍वात हरवलेल्या त्या साऱ्याजणी. अवतीभवती काय चालू आहे, याचे त्यांना सुतरामही भान नाही.

पण, आता परिस्थिती बदलली. त्या सुधारल्या, परंतु घरी जाता येत नाही. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आत्मविश्वासाचे बळ मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले. मनोरुग्णालय प्रशासनाने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना संधी मिळू लागली. आठ ते दहा सुधारलेल्या मनोरुग्ण महिलांना झाडू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. या प्रशिक्षणातून येथील महिलांच्या आयुष्याला आकार येत असल्याची भावना येथे व्यक्त होत आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून उपचार घेत असलेल्या वैफल्यग्रस्त महिलांचे आयुष्य म्हणजे येथील दगडी भिंतीआडचे जगणे. पूर्वी उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु अलीकडे येथील मानसोपचारतज्ज्ञांनी या महिलांच्या मानसिक वैफल्याचा अभ्यास करून त्या या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी औषधांसह त्यांच्या मनाचे विश्‍लेषण करण्याचा नवीन उपाय शोधला. त्यांच्या मनात स्वावलंबनाचे अंकुर फुटावेत आणि कुटुंबात त्यांचे पुन्हा सहज समायोजन व्हावे, या उद्देशाने येथे काम होऊ लागली.

सामाजिक पुनर्वसन करण्याचा प्रादेशिक मनोरुग्णालयाचा प्रयत्न सध्या सफल होत आहे. मात्र, एकदा मानसिक धक्का बसल्यानंतर ते सुधारूच शकत नाही, हीच मानसिकता नातेवाइकांची बनली आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय यांच्यापासून दूरच राहतात. भेटायलाही येत नाही. भेट घेण्यासाठी आलेच तर साहेब येथेच ठेवा, असे सांगून मोकळे होतात. यामुळे अखेर टाटा ट्रस्टच्या सहकार्याने या महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. आठ ते दहा महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी उपचाराने बरे झालेल्या महिलांना स्क्रिन प्रिंटिग, ब्लॉक्‍स पेंटिंगसह स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी बेकरी, फूड सेंटर, ब्युटीपार्लरसारख्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले.


उपचारातून रुग्ण बरे होत आहेत. परंतु, त्यांच्यात सुधारणा झाल्यानंतरही नातेवाईक घरी घेऊन जात नाही, हीच खरी शोकांतिका आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून त्यांचे सामाजिक पुनवर्सन करण्यासाठी प्रशिक्षण योजना सुरू केली. ऑफिस बॉयपासून तर सुरक्षारक्षक आणि कॅंटीनमध्ये काम करण्यासाठी सुधारलेल्या मनोरुग्णांना संधी दिली आहे. मनोरुग्णांचे पुनर्वसन केंद्रस्थानी ठेवून उपक्रम राबविण्यात येतात.
- डॉ. माधुरी थोरात, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.


औषधोपचारातून सुधारणा होण्याची शक्‍यता वाढलेली आहे. बरे झालेल्या मनोरुग्णांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनोरुग्णालयात प्रयत्न होत आहेत. परंतु, कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या व्यक्तीवर प्रेम करावे. त्याला पुन्हा घरचे प्रेम द्यावे.
- डॉ. प्रवीण नवखरे, उपवैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT