umesh yadav
umesh yadav 
विदर्भ

क्रिकेटपटू उमेश यादवला चोरट्यांचा हिसका; आरोपींना अटक

सकाळवृत्तसेवा

नागपूर: वेगवान गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांच्या दंड्या गुल करणारा विदर्भाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव याला सोमवारी चोरट्यांनी चांगलाच हिसका दाखविला. चोरांनी त्याच्या शिवाजीनगरस्थित फ्लॅटमधून दोन महागडे मोबाईल व रोख 50 हजार रुपये लंपास केले. अवघ्या 14 तासांच्या आतच पोलिसांनी अतिशय शिताफीने दोन्ही आरोपींना मुद्‌देमालासह अटक केली. मात्र, शंकरनगरसारख्या गर्दीच्या व अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात घडलेली ही घटना, शहरातील एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. शिवाय या घटनेमुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियात कालच अधिकारी म्हणून रुजू झालेल्या उमेशच्या आनंदावरदेखील काही प्रमाणात विरजण पडले.

शिवाजीनगर येथील "इम्प्रेसा राईस' या पॉश अपार्टमेंटच्या नवव्या माळ्यावर राहणारा उमेश व त्याची पत्नी तान्या सायंकाळी मित्राकडे जेवण करण्यासाठी गेले होते. डिनर करून रात्री नऊच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे आढळून आले. शोधाशोध केली असता महागडे ऍपल व व्हिवोचे दोन मोबाईल व रोख 50 हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले. उमेशने लगेच शैलेश ठाकरे नावाच्या आपल्या मित्राला फोन करून घरी बोलावून घेतले. श्रीलंका दौऱ्याच्या घाई गडबडीत असल्यामुळे उमेशने शैलेशलाच पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. या घटनेची अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोनपैकी 17 वर्षीय अल्पवयीन चोरट्याला पहाटेच्या सुमारासच अटक केली. तर, दुसऱ्या मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातील शिवनी येथे अटक करण्यात आली.

उमेश राहात असलेल्या खालच्या म्हणजेच नवव्या माळ्यावर जैन यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरू आहे. तेथील दोन कामगारांनी मागच्या पाईपच्या आधारे वर चढून फ्लॅटच्या किचनमधील काचेच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. मिळेल त्या वस्तू व रोख रक्‍कम घेऊन चोरांनी आले त्याच मार्गाने लगेच पळ काढला.

चोरट्याला भोवली चूक
या घटनेतील मुख्य आरोपीने केलेली साधी चूक त्याला पोलिसांच्या तावडीत घेऊन गेली. शिवनी (मध्य प्रदेश) येथे राहणाऱ्या आरोपीने उमेशच्या घरुन चोरलेल्या ऍपलच्या मोबाईलमध्ये स्वत:चे सीम कार्ड टाकून मोबाईल सुरू केला आणि रातोरात शिवनीला पळाला. या अती शहाणपणामुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कारण पोलिसांनी लगेच त्याच्या "लोकेशन'चा शोध घेत, शिवनी गाठून त्याला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी नागपूरहून पोलिसांचे विशेष पथक मध्यप्रदेशला गेले होते. चोराला पकडण्यात आधुनिक तंत्र आणि "सायबर क्राईम टीम'ची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT