ed esakal
विदर्भ

ईडीच्या रडारवर विदर्भ! देशमुख, गवळीनंतर आणखी एकाला समन्स

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : ईडी कारवाईसाठी सद्या विदर्भ दौऱ्यावर असल्याची दिसून येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईसाठी नागपुरात दाखल झालेली ईडी मागील काही दिवसांपासून विदर्भात कारवाई करीत आहे. अनिल देशमुख यांच्यावर कारवाईच्यानिमित तीन ते चार वेळा नागपुरात आल्यानंतर त्यांनी वाशीम जिल्‍ह्यात धडक दिली. त्याच दिवशी नागपुरात त्यांनी कारवाई केल्याची चर्चा होती. आता त्यांनी आपला मोर्चा अमरावती जिल्ह्यात वळविल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा माध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अधिकाऱ्याला ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्या अधिकाऱ्याला ७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मुंबई येथील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा बँक घोटाळ्याला आणखी गंभीर वळण लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत म्युचल फंड घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला असतानाच अचानक ईडीची एन्ट्री झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी मागील आठवड्यात मुंबईला जाऊन ते सादर केल्याची माहिती आहे.

आता या प्रकरणी ईडीने बँकेशी संबंधित माजी अधिकाऱ्याला चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसांत आणखी काही जणांना ईडीकडून हजार राहण्यासाठी समन्स दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT