Nagpur Rain News sakal
विदर्भ

Nagpur Rain News : पाऊस न आल्यास रब्बीला धोका; धरणे अजून अर्धीच; सावनेर उपविभागाला दमदार पावसाची प्रतीक्षा

पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी सावनेर उपविभागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही.

अशोक डहाके

केळवद : पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी सावनेर उपविभागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये अर्धाच जलसाठा उपलब्ध असून अशीच स्थिती कायम राहिल्यास रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सावनेर तालुका उपविभागातील एकाही प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झालेली नाही. पुरेसा पाऊस न आल्याने नदी-नाल्यांनाही पाणी नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे.

मागील वर्षी सावनेर तालुक्यात जुलै २०२२ पर्यंत ६५४.४२ मि.मि. इतका पाऊस पडला होता. त्यामुळे सर्वच प्रकल्प, गावतलाव तुडूंब भरले होते. अर्थात बहुतांश प्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा होता.

मात्र, यावर्षी ३१ जुलैपर्यंत केवळ ३८९.०८२ मि.मि. इतकाच पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढलेली नाही. आतापर्यंत सावनेर तालुक्यात झालेला पाऊस पेरणीसाठी कमी-अधिक प्रमाणात उपयोगी ठरला.

त्यातही काही भागात फारच कमी पाऊस झाला. पेरण्या झाल्या असल्या तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाला नाही. उरलेल्या पावसाळ्यात दमदार न बरसल्यास खरीप हंगाम तर हातचा जाईलच पण रब्बी हंगामही धोक्यात येऊ शकतो.

त्यामुळे सावनेर उपविभागाला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. पुरेसा पाऊस न झाल्यास धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

...तर पिण्याच्या पाण्याचे काय?

सावनेर उपविभागात चार मध्यम तर आठ लघुप्रकल्प आहेत. दोन महिने झाले तरी या प्रकल्पांमधील पाणी पातळी वाढलेली नाही. आगामी दोन महिन्यांत जर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिके घेता येणार नाहीत. तसेच पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही उपस्थित होण्याची शक्यता आहे. भूजल पातळीत वाढ न झाल्याने विहिरी कोरड्या होण्याचे संकेत असून ग्रामीण भागात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

३१ जुलै २०२३ धरणांमधील जलसाठा

  • केखरनाला ४१.९३

  • उमरी ५८.८३

  • कोलार ४५.३९

  • खेकरानाला ६५.७३

  • नांदा ५८.७२

  • माहुरकुंड २३.५८

  • नागलवाडी ३६.१६

  • कान्हादेवी ५०.१२

  • सुवरधरा ४४.३०

  • भागीमहारी २६.६८

  • रायबासा २४.२२

  • खुमारीनाला ४३.७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT