sakmur village flood sakal
विदर्भ

गावात ना पिण्याचे पाणी नाही किराणा.... दहा दिवसांपासून पूराने वेढलेल्या सकमुरात

वर्धा नदीकाठावर पुरानं वेढलेल्या सकमुर गावाची स्थिती बिकट झालीय. गावाचा चौफेर पाणीच पाणी.

संदीप रायपुरे

वर्धा नदीकाठावर पुरानं वेढलेल्या सकमुर गावाची स्थिती बिकट झालीय. गावाचा चौफेर पाणीच पाणी.

गोंडपिपरी - चहुबाजून पाणीच पाणी. बेटाच स्वरूप आलेल्या गावात पिण्याच शुध्द पाणी नाही. गावातील जे काही दुकान आहेत, तेथील किराणाही संपण्याच्या मार्गावर. शेती तर पुरती डुबलीय. तब्बेत बिघडली तर गावात औषधीचीही आशा नाही. अशा अवस्थेत गेल्या दहा दिवसापांसून सकमूर, चेकबापूर वासियांचे प्रचंड हाल होताहेत. गावात अशी भिषण अवस्था असतांना प्रशासन, लोकप्रतिनिधी काय करताहेत असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

वर्धा नदीकाठावर पुरानं वेढलेल्या सकमुर गावाची स्थिती बिकट झालीय. गावाचा चौफेर पाणीच पाणी. शेत बांध्याला तळाचा स्वरूप आलं आहे. गावातील आरोग्य सूविधा कोळमळली. पाणी टंचाईनं नागरिकांना दाहीदिशा भटकावे लागत आहे. गावातील दुकानातील किराणा माल संपण्याचा मार्गावर आहे. त्यामुळं भर पुरातून लहान-सहान वस्तूसाठी भरपुरातून सकमुर गावातील नागरिक मार्ग काढीत आहेत.

जिल्ह्यात महापुरानं वेढा दिला आहे. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सूरू आहे. त्यामुळं वर्धा, इरई, वैनगंगा नदीला पुर आला. नदीकाठी वसलेल्या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील सकमूर गावाला पुराचा पाण्यानं वेढा दिला आहे. त्यामुळं गावाला बेटाच स्वरूप आलं आहे. गावातील नागरिक गावातच अडकून पडले आहेत. भिषण पुरातून नावेने मार्ग काढीत गावकरी शेत गाठीत आहेत. आरोग्याची समस्या उदभवली तर पुरातून मार्ग काढीत सात कि.मी.चा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. जिल्ह्यातील शहरी भागात प्रशासनाची मदत पोहचली आहे. मात्र, पूरात अडकलेले गावखेडे अद्यापही मदतीचा प्रतिक्षेत आहेत.

गावात अशी गंभीर स्थीती असतांना याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे. ना लोकप्रतिनिधींचे. त्यांच्या या भुमीकेमुळ गावात संतापाच वातावरण आहे.

डोंग्याचा जिवघेणा आधार....

सकमूर, चेकबापूर गावाला, पुर्णत बेटाच स्वरूप आलय. गेल्या दहा दिवसापासून गावाचा संपर्क तुटलेला. अशा स्थीतीत अतिशय महत्वाच्या कामासाठी नागरिकांना डोंग्याचा जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारत सोडले उपोषण; म्हणाले- आज सोन्याचा दिवस

Latest Marathi News Updates: आंदोलन यशस्वी झाल्याने जरांगेंना अश्रू अनावर

Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

Maratha Reservation : मराठा-मुस्लीम एकतेचे दर्शन; आंदोलकांसाठी आडूळ गावातून पाठवले खाद्यपदार्थ

Maratha Reservation and Satara Gazette : 'सातारा गॅझेट' म्हणजे नेमकं काय अन् मराठा आरक्षण आंदोलनात का आहे याला महत्त्व?

SCROLL FOR NEXT