sharad pawar, chandrashekhar bawankule Sakal
विदर्भ

Vidarbha: शरद पवार यांचे लवकरच मतपरिर्वतन; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप व सरकारकडून अडथळे आणल्या जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा असून हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे विचाराधीन आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक राजकारणावर श्रद्धा ठेवत एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार यांचे सुद्धा मत व मनपरिवर्तन होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केला. शरद पवार व सुप्रिया सुळे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मदत करतील असे मला वाटते, असेही ते म्हणाले.

भाजपच्या महासंवाद यात्रेनिमित्त ते शुक्रवारी (ता.२५) अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. श्री. बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपचे पूर्ण सहकार्य राहणार असून महायुती राज्यात लोकसभेच्या ४० पेक्षा जास्त तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप व सरकारकडून अडथळे आणल्या जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा असून हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे विचाराधीन आहे. येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाकडूनच त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या विलंबास भाजप किंवा सरकार जबाबदार असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले, पत्रपरिषदेला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे, जयंत डेहणकर, किरण पातूरकर, तुषार भारतीय, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, निवेदिता चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. रवींद्र खांडेकर, युवा मोर्चाचे बादल कुलकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर चेतन गावंडे, चेतन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अमरावतीत ‘कमळा’साठी आग्रही

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा या आमच्या सहयोगी सदस्य असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील उमेदवार भाजपच्याच चिन्हावर लढेल, असा आमचा आग्रह राहणार आहे. अंतिम निर्णय पार्लमेन्ट्री बोर्ड घेईल असेही श्री. बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT