File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : विदर्भाचा जनादेश मतयंत्रात "सीलबंद'

अनंत कोळमकर

नागपूर : मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विदर्भातील 755 उमेदवारांचे भाग्य आज सोमवारी मतयंत्रात "सीलबंद' झाले. विदर्भात असलेल्या 62 मतदारसंघातील 59 टक्के मतदारांनी आज त्यांचा आमदार निवडण्यासाठी मतदान केले. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीतच त्यांच्या भाग्याचा फैसला होईल. आजचे मतदान सर्वत्र शांततेत पार पडले असले तरी शेंदूरजना घाट (जि. अमरावती) येथे आघाडीच्या उमेदवाराचे वाहन जाळल्याच्या घटनेचे एक गालबोट मतदानाला लागले. तर आघाडीचा एक उमेदवार मतदानपूर्व मध्यरात्री पैशांच्या पाकिटासह पोलिसांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर रात्री 8.30 वाजता असलेल्या मतदानाच्या सरासरी आकडेवारीनुसार विदर्भातील अकरा जिल्ह्यात मिळून एकूण 59.11 टक्के मतदान झाले आहे. त्यात सर्वाधिक 67.33 टक्के मतदान भंडारा जिल्ह्यात झाले. मतदारसंघनिहाय टक्केवारीचा विचार केला असता भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघात सरासरी 70 टक्के मतदान झाले आहे. आयोगाच्या वेबसाईटवरील मतदानाच्या आकडेवारीत बुलढाणा जिल्ह्याची आकडेवारी दिलेली नाही. परंतु प्राप्त माहितीनुसार या जिल्ह्यात 60 टक्के मतदान झाले आहे. अंतिम आकडेवारी अजून जाहीर व्हायची आहे.
मतदान सुरू झाल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये व व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी झाल्यात. तेथे काही काळ मतदान थांबली. आयोगाने तातडीने त्याठिकाणी नवीन मशीन पोहचवल्या व मतदान परत सुरू झाले.
आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी, डॉ. अभय व डॉ. राणी बंग, डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रवीन्द्र व स्मिता कोल्हे, शंकरबाबा पापळकर, "करोड'पती बेबीताई ताटे या मान्यवरांनी मतदान केले.
मोर्शी (जि. अमरावती) मतदारसंघातील महाआघाडी समर्थित स्वाभिमान शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर काही अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांची गाडी जाळली. त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्याचेही सांगण्यात येत आहे. भुयार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे काही काळ शेंदुरजना पोलिस ठाण्यासमोर गोंधळही झाला. नागपुरात पश्‍चिम नागपूर मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे व राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे एक लाखाच्या रकमेसह काल मध्यरात्री पोलिसांना आढळून आले. त्यामुळए राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
एटापल्ली (जि. गडचिरोली) तालुक्‍यातील जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू पांडु गावडे (वय 45) यांचा निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. त्यांची अहेरी मतदारसंघातील पुरसलगोंदी येथील बुथवर ड्यूटी लागली होती. ते पुरसलगोंदीकडे पायी जात असतांना गावडे हे भोवळ येऊन पडले. त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना चामोर्शी येथील बुध क्र. 207 वर कार्यरत कर्मचारी विजय गजानन खंडाळे (45) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT