Vidhan Sabha 2019 congress leader vijay wadettiwar statement on cm fadnavis vardha
Vidhan Sabha 2019 congress leader vijay wadettiwar statement on cm fadnavis vardha 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : ‘फडणवीसांनी अंगाला नाही, महाराष्ट्राला तेल लावले’; वाचा कोणी केली टीका?

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा उल्लेख तेल लावून आलेला पहिलवान असा केला होता. त्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे जाहीर सभा झाली. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला.

काय म्हणाले वडेट्टीवार?
राहुल गांधी यांच्या भाषणाच्या आधी, विजय वडेट्टीवार यांचे भाषण झाले. त्यात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. वडेट्टीवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मी तेल लावून आलेला पहिलवान आहे, असं वक्तव्य केलंय. मी म्हणतोय होय या मुख्यमंत्रांनी तेल लावलंय ते महाराष्ट्राला. त्यानंतर उरलं, सुरलं तेल आपल्या अंगाला लावून घेतलंय. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. कारखाने ओस पडले. कामगार कपात सुरू आहे.’

पाच वर्षे काय केले?
वडेट्टीवार म्हणाले, ‘काँग्रेसने 60 वर्षांत देशाला उभे केले आहे. आता देश कुठे पोहोचला आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सात बारा कोरा करू’ मग पाच वर्षे सत्तेत असताना तुम्ही काय केले? मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला तेल लावले, विना तेल लावता त्यांना आता जनता धूळ चारेल.’ महाराष्ट्रातील एमआयडीसींमधील 52 टक्के उद्योग बंद पडले. तरुणांना नोकऱ्या नाहीत, हे पाप कोठे फेडाल?, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT