विदर्भ

Vidhan sabha 2019 : आता कामठी कुणाच्या बाजूने; भोयर यांच्याविरुद्ध सावरकर मैदानात 

वीरेंद्रकुमार जोगी

नागपूर, ता. 18 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी नाकारून नाट्यमय परिस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती टेकचंद सावरकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. बावनकुळे यांचे समर्थक नाराज असल्याने कॉंग्रेसला याचा फायदा होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. प्रचाराचा धुराडा पाहता मतदारसंघातील कामठी, मौदासह नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील जनता कुणाला साथ देणार याचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. 
मागील विधानसभा निवडणुकीत सुरेश भोयर यांना उमेदवारी नाकारून कामठीतून राजेंद्र मुळक यांना कॉंग्रेसने तिकीट दिले होते. त्यांनी बावनकुळे यांना चांगलेच जेरीस आणले होते. यावेळी सुरुवातीपासूनच भोयर हे दावा करीत होते. तरीदेखील त्यांची उमेदवारी निश्‍चित नसल्याची चर्चा होती. यामुळे ते मतदारसंघ बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. दुसरीकडे बावनकुळे यांनी मतदारसंघ बांधणीवर जोर दिला. जनता दरबार, वेळोवेळी सभा, मुंबईत नसताना सातत्याने मतदारसंघात फिरून समस्या सोडविण्यावर व विकासकामांवर भर देत होते. त्यांची उमेदवारीही निश्‍चित मानली जात होती. निवडणूक जवळ येत असताना त्यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. 
भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या यादीतही बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अखेरच्या वेळी टेकचंद सावरकर यांच्यागळी उमेदवारीची माळ पडली. सुरुवातीचे काही दिवस प्रचाराला सुरुवात कशी करावी हेच सावरकर यांना कळत नव्हते. तर भोयर यांनी दणक्‍यात प्रचाराचा नारळ फोडला. त्यांची बाजू चांगली असल्याचे चित्र कामठीत निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक राजकारणाच्या खेळीत हातोटी असलेल्या सावरकर यांनी प्रचाराचा धुराडा उडवित भोयर यांची बरोबरी साधली. आता बावनकुळे यांचाही पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने त्यांची बाजू चांगलीच सावरली आहे. 
कामठी मतदासंघातील मतांच्या समीकरणाची जाती-धर्म व शहरी-ग्रामीण अशी विभागणी होते. नागपूर शहरालगतचा मोठा भाग कामठीत समाविष्ट आहे. येथून भाजपला आघाडी मिळते. कामठी शहरामधून कॉंग्रेसला मते मिळणार हे निश्‍चित आहे. कामठी व मौदा या दोन्ही तालुक्‍यातील ग्रामीण भागातील मतदारांवर यावेळी विजयाची धुरा आहे. सावरकर यांना तेली तर भोयर यांना विजयासाठी कुणबी मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT