संजय धोत्रे
संजय धोत्रे 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 :भाजपमधील अंतर्गत वादात केंद्रीय राज्यमंत्र्यांची सावध भूमिका

सकाळ वृत्तसेवा

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान आमदाराने स्वपक्षाच्याच पालकमंत्र्यांविरुद्ध तोंडसुख घेतल्यानंतर या वादावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सावध भूमिका घेतली आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, मतदानापूर्वी सर्व व्यवस्थित होईल, असा विश्वासही त्यांनी दर्शविला.
भाजप-शिवसेना युतीमध्ये जिल्ह्यात सर्वच आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी युतीतील बेबनाव वारंवार उघड होत आहे. त्यातच आता भाजपच्या अंतर्गत वादाला पुन्हा भरती आली आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीतच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याविरुद्ध गरळ ओकली होती. त्याला सकल मराठा समाजाने विरोध करीत हरीश पिंपळे यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे.
भाजपच्या या अंतर्गत वादावर केंद्रीय राज्यमंत्री मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हरीश पिंपळे यांची बाजू उचलून धरताना चार दिवसांपूर्वी केलेल्या भाषणातील संदर्भ वगळून तोडून-मोडून भाषण दाखविले जात असल्याचे ते म्हणाले. शिवाय निवडणूक काळात प्रचारापेक्षा अप्रचाराला जास्त महत्त्व दिले जात असल्याचे ते म्हणाले. चार दिवसांपूर्वी जे होते ते आज नाही, आज जे आहे, ते चार दिवसांनी राहणार नाही. तिकिट वाटपानंतर झालेली नाराजी दूर होण्यास विलंब लागले. पण वेळेत सर्व काही व्यवस्थित होईल, असा दावाही त्यांनी केला.
नाराजी दूर करण्यासाठी बैठका
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये राजी-नाराजीचे नाट्य सुरू आहे. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. अकोला शहरातील शिवसैनिकांचीही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT