Vidharbha esakal
विदर्भ

Vidharbha : गट विकास अधिकारी कार्यालय ‘लॉकडाऊन’

पंचायत समितीचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर; विकासाला खीळ

सकाळ डिजिटल टीम

रिसोड : पंचायत समितीचा कारभार प्रभारी गट विकास अधिकारी यांच्या खांद्यावर असल्यामुळे इतर प्रशासकीय कामानिमित्त सदर गट विकास अधिकारी यांना सतत बाहेरगावी जावे लागत आहे. परिणामी येथील गट विकास अधिकारीऱ्याचे कार्यालय " लॉकडाऊन " असल्याचे दिसते. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या गरजू लाभार्थ्यांचे हेलपाटे व्यर्थ जात आहेत. पंचायत समितीचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर असल्यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे.

समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी हे खुप महत्वाचे प्रशासकीय पद आहे. परंतु जिल्हा परिषदेकडे अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे एकाच व्यक्तीकडे दोन, तीन पंचायत समितीचा कारभार सोपविण्याची नामुष्की वाशीम जिल्हा परिषदेला पत्करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. तरीसुध्दा आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्या जात नाहीत. ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी शोकांतिका म्हणावी लागेल.

रिसोड पंचायत समितीत प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कैलाशराव घुगे यांच्याकडे कारंजा पंचायत समितीचा कायमस्वरूपी कारभार असून, मालेगाव पंचायत समितीचा कारभार सुद्धा त्यांनाच पहावा लागतो. त्यातच पुन्हा रिसोड पंचायत समितीचा कारभार त्यांच्याच खांद्यावर सोपविल्यामुळे " एक ना धड भाराभर चिंध्या " अशी गत समितीच्या कारभाराची झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांसह, गोरगरीब लाभार्थी प्रशासनाप्रती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

ग्राम पंचायतीची विकास कामे ठप्प

गाव पातळीवरील बहुतांश विकास कामे ही पंचायत समिती अंतर्गत होत असतात. परंतु जबाबदार अधिकारीच गैरहजर असल्यामुळे सबंधित सचिव आणि सरपंच यांची मोठी पंचाईत होत असल्याचे अनेक सरपंच बोलत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश विकास कामे ठप्प झाली असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.

रिसोडचे गटविकास अधिकारी मंगरूळपीरात

या बाबत रिसोड येथे प्रभारी असलेले गटविकास अधिकारी कैलाशराव घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, ते काल ग्राम पंचायतीच्या पंचनाम्यासाठी मंगरूळपीर येथे गेले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवाय त्यांच्याकडे कारंजा, मालेगाव आणि रिसोड अशां तीन ठिकाणाचा पदभार असल्यामुळे एकच व्यक्ती कुठे कुठे हजर राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT