A village that foster brotherhood in partition. 
विदर्भ

Video : देशाची फाळणी झाली तेव्हा या गावातील हिंदूंनी दिले मुस्लिम बांधवांना संरक्षण; बंधूभाव जोपासणारे गाव

नीलेश झाडे

धाबा (जि. चंद्रपूर) : अखंड भारत देशाची फाळणी झाली. भुभागावर ओढलेल्या सिमारेषेने हिंदू-मुस्लिम एकतेवर प्रहार केला. ज्या नजरेत प्रेमभावना होती ती नजर संशयी झाली. देशात दंगली उसळल्या. अशा बिकट स्थितीत एका गावाने बंधूभाव जोपासला. मुस्लिम बांधवाना स्वरक्षण दिले. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात आजही हा बंधूभाव कायम आहे.

१५ आॕगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटीशांचा गुलामगिरीतून भारत देश स्वातंत्र झाला. स्वातंत्र्याचा आनंदोत्सव देशात साजरा होत असतानाच अखंड भारत देशाची झालेल्या फाळणीचे दुखही अनेकांना होते. या फाळणीने देशातील हिंदू-मुस्लिम बंधूभावाला तळा गेला. हिंदू-मुस्लिम बांधव संशयी नजरेने एकमेकांकडे बघत होते. देशात दंगली उसळल्या होत्या. परस्थिती हाताळण्यासाठी मुस्लिमबहुल भागात आर्मीचा तुकड्या तैन्यात केल्या होत्या.

हैद्राबाद संस्थानचा सीमा लागून असलेल्या धाबा येथील पोलिस ठाण्यामध्ये आर्मी दाखल झाली होती. देशातून ज्या बातम्या ऐकू येत होत्या त्या बातम्यांनी धाबा गावातील मुस्लिम बांधव हादरले होते. या कठीण परिस्थितीत गावातील हिंदू बांधव पुढे आले. त्यांनी मुस्लिम बांधवाना धीर दिला. आधार दिला. त्यांच्या स्वरक्षणासाठी उभे झालेत.

उस वक्त की मोहबत्त सच्ची थी!

बाबूभाई फकीर मोहम्मद शेख यांनी वयाची ८५ गाठली आहे. वडिलांनी आणि आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी त्यांच्या स्मरणात आजही आहेत. धाबा गावाचा मातीतच बंधूभाव रूजला आहे. अनेक संकटे आलीत मात्र येथील एकतेला कधीच तळा गेलेला नाही. कठीण समयी हिंदू बांधवानी आधार दिला म्हणून आज आम्ही या गावात आहोत. ‘उस वक्त की मोहबत्त सच्ची थी... आज भी है’ असे ते आवर्जून सांगतात.

आम्ही एकत्र मोठे झालोत

त्याकाळी गावात ६० ते ६० मुस्लिम बांधवांची घरे होती. आम्ही एकत्र मोठे झालोत. फाळणी नंतर जी काही स्थिती देशात निर्माण झाली त्याचा विपरित परिणाम गावात घडला नाही. आम्ही गुण्यागोविंदाने जगत आलोत आणि पुढेही जगणार आहोत.
- डोनू बावणे

राम भी यही रहीम भी यही

गावाचा मध्यभागी संत परहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान आहे. तर गावाचा सुरुरवातीलाच दरोगा बाबा यांच्या दर्गा आहे. कोंडय्या महाराजांची यात्रा महोत्सव असो वा दर्गात साजरा होणारा उर्स असो. गावातील नागरिक हीरहीरीने सहभाग घेतात. जुन्या पिढीने जोपासलेला बंधूभाव नव्या पिढीनेही अंगीकारला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT