file photo 
विदर्भ

शासनाच्या योजनाही गावकऱ्यांना माहीत नाही

मुनेश्वर कुकडे/ राहुल हटवार

गोंदिया : राज्य सरकारच्या नकाशावर नक्षलग्रस्त गावे म्हणून टेकाटोला, मुरकुडोह 1, 2, 3 व दंडारी ही नावे कोरली आहेत. पण शासनाच्या विकास योजनांचा या गावाला पत्ताही नाही. घरोघरी वीज पोहोचल्याचा दावा सरकार करते, पण 33 घरांच्या टेकाटोला गावातील 17 घरांत डिमांड भरूनही वीज मिळाली नाही.
या गावांचा प्रमुख व्यवसाय शेतीचा. पण, तोही पावसावर अवलंबून. पाऊस झाला, तर हातात पैसा. शेतीचा हंगाम संपला की, रोजीरोटीचे दुसरे साधन तेंदूपत्ता, मोहफुलांची वेचणी. त्याच्या मिळकतीतून जमते वर्षभराची पुंजी. दोन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेत लोकांनी कामे केली. पण, अजून मजुरी मिळाली नाही आणि त्याबाबत कुणीही "ब्र' काढायची हिंमत करीत नाही. गावात बारावी, पदवीधर तरुण आहेत, पण पुढे काय करायचं, हेच माहीत नाही. त्यामुळे हातात नांगर धरण्याशिवाय पर्याय नाही. टेकाटोलातील एकाही तरुणाला शासकीय वा खासगी नोकरी नाही.
साऱ्या गावांत विटामातीची घरे किंवा झोपड्या. "2022 पर्यंत सर्वांना घरे' ही शासनाची योजना गावकऱ्यांना माहीतही नाही. आदिवासी गोंड समाजासाठीही शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा प्रसार करणारी प्रशासकीय यंत्रणा पाचवीला पूजल्याप्रमाणेच गावांत येते अन्‌ केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडून परत जाते. त्यानंतर ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे पीककर्ज, शेतीपयोगी अवजारे, अनुदानावरील बी-बियाणे, खते कधीच येथील नागरिकांना मिळाले नाही. कृषी विभागाचा "आत्मा' गावात पोहोचलाच नाही.
2018 रोजी दरेकसा सोसायटीत धानाची विक्री केली होती. त्याचा बोनसही अजून मिळाला नाही, असे गावकरी सांगतात.
फोनवाले आमदार
या क्षेत्राचे आमदार संजय पुराम हे आहेत. त्यांच्याकडे समस्या घेऊन कोणी गेला, तर ते संबंधित अधिकाऱ्याला लगेच फोनही करतात. समस्या पाहून घ्या...एवढे सांगतातही... पण समस्या "जैसे थे'च असतात... त्यामुळे आमदारांच्या फोनवरचा विश्वास उडाला, असे गावकरी सांगतात. एका तरुणाने सांगतानाच आमदारांचा उल्लेख "फोनवाले आमदार' असाच केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : राज्यात गुलाबी थंडीचे आगमन, दिवाळीनंतर जोर वाढणार; जाणून घ्या तुमच्या भागात आज कसे असेल हवामान?

Diwali Padwa 2026 Wishes in Marathi: पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण! दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या जोडीदाराला द्या प्रेमळ शुभेच्छा संदेश

Pune Water Crisis: पुण्यात पाणीकपात; मात्र बचतीचा फज्जा; गळतीसह अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेकडे ठोस कृती आराखड्याचा अभाव

ZIM vs AFG Test: झिम्बाब्वेने कसोटी क्रिकेटचा १४९ वर्षांचा इतिहास-भूगोल बदलला; असा विश्वविक्रम जो भारतासह अनेक तगड्या संघांना नाही जमला

Diwali on Farm: बांधावर व्हावी रोजच दिवाळी!

SCROLL FOR NEXT