pavanar
pavanar 
विदर्भ

आजही विनोबांचा आश्रम देतो स्वावलंबनाची प्रेरणा

राहुल खोब्रागडे

पवनार (जि. वर्धा) : 'जय जगत'चा नारा देणाऱ्या आणि भूदान चळवळ राबवून दान मिळालेली लाखो एकर जमीन भूमीहिनांना देणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांची आज शुक्रवारी (ता. ११) १२५ वी जयंती आहे .

आचार्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला परमधाम आश्रम पवनार येथील धाम नदीच्या तीरावर आहे. देश-विदेशातील पर्यटक व त्यांचे अनुयायी येथे नतमस्तक होण्याकरिता येतात. येथील ब्रह्मविद्या मंदिर सामूहिक साधनेचे केंद्र आहे.

आचार्य विनोबा भावे यांनी गीताई, भूदान चळवळ, सर्वोदय चळवळ, महात्मा गांधी तत्त्वदर्शन, वेद-उपनिषदांचे व्यासंगी चिंतन, सामूहिक साधना, जगण्याचे विविध प्रयोग, वैज्ञानिक भूमिकेतून भारतीय तत्त्वज्ञानाची मांडणी केली. त्यांची वृत्ती आध्यात्मिक आणि दृष्टी वैज्ञानिक होती. म्हणूनच ते आधुनिक ऋषी म्हणून उदयास आलेले एक तपस्वी व्यक्‍तिमत्त्व होय.

हे वर्ष विनोबांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. येथील धाम नदी तीरावर स्थित ब्रह्मविद्या मंदिर (परमधाम आश्रम) ही आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी होय. येथे त्यांनी जगण्याचे विविध प्रयोग केले. संतांची ही कर्म व प्रेरणाभूमी आहे.

या भूमीतून प्रेरणा घेण्याकरिता देशभरातून दररोज शेकडो पर्यटक तथा अनुयायी येथे भेट देतात. त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करतात. आजही येथील ब्रह्मविद्या मंदिरात अतिशय साध्यापद्धतीने जीवन जगणारे अनुयायी आहेत. विनोबांच्या या आश्रमातील सर्व कार्य आजही अत्यंत साधेपणाने त्यांच्या शिकवणीप्रमाणेच चालते.
या आश्रमात कुणीही एक प्रमुख नाही. सर्वांनाच समान अधिकार आहेत. विनोबांनी दिलेली शिकवण व स्वावलंबन याचे आजही या आश्रमात कटाक्षाने पालन केले जाते.

सविस्तर वाचा - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात?

त्यांनी आपल्या जीवनात सामूहिक साधनेला अतिशय महत्त्व दिले. सामुदायिक जीवन ते जगत होते. ब्रह्मविद्या मंदिर हेच त्यांच्या सामूहिक साधनेचे केंद्र होते. या भूमीतून सामुदायिक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT