भामरागड : नाल्यातून पोहत मतदानासाठी जाताना दिव्यांग प्राजून गावडे. 
विदर्भ

भामरागड : दिव्यांग मतदाराने नाल्यातून पोहून केले मतदान

अविनाश नारनवरे

भामरागड (जि. गडचिरोली)  : एकीकडे शहरी भागात सर्व सुविधा असतानाही अनेक नागरिक मतदानास जात नाही, तर दुसरीकडे भामरागडच्या अतिदुर्गम गावात कोणत्याही सुविधा नसताना दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या एका मतदाराने वाटेत आलेल्या तुडुंब नाल्यातून पोहून येत मतदान करीत आपला घटनादत्त अधिकार बजावला. प्राजून लिंगू गावडे नामक या लोकशाहीप्रेमी व जिद्दी मतदाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवारी (ता. 20) मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने भामरागड तालुक्‍यातील अनेक गावांना नदी-नाल्यांनी वेढले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मात्र, अशाही परिस्थितीत सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मदतानात काही जिद्दी मतदार सहभागी झाले. अशाच एका जिद्दी मतदाराला सलामच ठोकावा लागेल. दोन्ही पायांनी दिव्यांग असताना चक्क नाला पोहत पार करून त्याने मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला आहे. भामरागड तालुक्‍यातील तुमरकोठी येथील प्राजून लिंगू गावडे असे या दिव्यांग मतदाराचे नाव आहे. प्राजून यांचे वय 43 वर्ष आहे. तरीही त्यांनी पाण्यातून पोहत येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महसूल प्रशासनाने त्यांना नाला पार करून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांनी कोणतीही मदत न घेता स्वतः नाला पार करून मतदानासाठी येणार असल्याचे ठामपणे सांगितले. महसूल विभागाने तालुक्‍यातील मरकनार, तुमरकोटी, मुरूमभुशी, कोरपर्शी, फुलनार, पोयरकोटी येथील मतदारांना डोंग्याच्या साहाय्याने तसेच हातात हात पकडून नाला पार करून मतदान केंद्रावर आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT