रोजीरोटीसाठी कष्ट उपसणारा वडार समाज वाऱ्यावर 
विदर्भ

Video : दगड फोडताना उडतात धारदार तुकडे अन्‌ हात-पाय होतात रक्‍तबंबाळ, वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : तापमान 45 अंश सेल्सिअस... रस्त्यांच्या कडेने दगडांपासून गिट्टी फोडण्याचे काम करणारा वडार समाज... एकीकडे उघड्या पाठीवर तापणारा सूर्य... दुसरीकडे दगडावर पडणारे घणांचे घाव... अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा... हे सारे सोसत त्यांची हाती जेमतेम अडीचशे रुपयांपर्यंत मजुरी पडते... त्यातून त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो... उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने वडार समाजाची दारूमदार केवळ छिन्नी-हातोडा व दगडावरच अवलंबून आहे. मात्र, लॉकडाउनने तेही हिसकावून घेतले आहे.

राज्यात वडार समाजाच्या मतदारांची संख्या एक कोटीच्या जवळपास आहे. वडार समाजाच्या गाडी वडार, माती वडार व पाथरवट या तीन पोटजाती आहेत. पुसद, उमरखेड, महागाव व आर्णी या तालुक्‍यांसह यवतमाळ जिल्ह्यात वडारांची संख्या उल्लेखनीय आहे. काळी दौलतखान येथील वडारवस्तीला भेट दिली असता गजानन मिटकर या युवकाचे कुटुंबीय दगडांपासून खलबते व वरंवटे तयार करीत होते.

मागणीनुसार हे कुटुंब महादेवाची पिंड, जाते, पाटे तयार करून देतात. या दगडी वस्तू तयार करण्यासाठी उन्हातान्हात मेहनत करावी लागते. दगड फोडताना उडणारे धारदार तुकडे बरेचदा हातापायांना रक्तबंबाळ करतात. पाचवा वर्ग शिकलेला 28 वर्षीय काळी येथील युवक गजानन मिटकर म्हणाला, "आमचे नशीब दगडांसोबतच खेळते. दगड फोडून खलबते, जाते व पाटे तयार करतो. यासाठी शेतातून दगड मिळविताना त्रास होतो. तयार वस्तूंची सायकल अथवा ऑटोरिक्षातून वाहतूक करीत खेड्यांत विक्री करतो. अलीकडे मिक्‍सर आल्याने जाते, पाटे व खलबते फारसे कुणी वापरत नाहीत. इमारतीच्या पायासाठी लागणारे डब्बर आता कुणी मागत नाहीत. त्यामुळे पाथरवट कामांवर अवकळा आली आहे.

उन्हातान्हात दगड फोडून कशीबशी पोटाची खळगी भरणारा वडार समाज लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारने वडार समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. लॉकडाउनमध्ये दगड फोडणे व घडविण्याची कामे ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आतातरी 'अनलॉक' होताना वडार समाजाला जातीचे आरक्षणासह सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.

लोकप्रतिनिधी फारसे लक्ष देत नाहीत

वडार समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही. पूर्वजांचे जन्मदाखले उपलब्ध नसल्याने नव्यापिढीतील मुलांना जातीचे दाखले मिळत नाहीत. राहण्यासाठी घरकुल नाही, निम्म्या लोकांनाच रेशन मिळते, शिक्षण व वसतिगृहाचा अभाव या समस्यांनी वडार समाज वेढलेला आहे. लोकप्रतिनिधी फारसे लक्ष देत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. सरकारने वडार समाजाच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
रमेश मिटकर,
अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, काळी दौलतखान.

वडार समाजाला काय हवं?

  • वडार समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण
  • वसंतराव नाईक विकास महामंडळात वडार समाजासाठी स्वतंत्र पूरक व्यवस्था
  • वडार समाजातील मुलांसाठी शिक्षण व वसतिगृहाची सुविधा
  • वडार समाजातील तरुणांना रोजगार
  • महामंडळासाठी शंभर कोटींची व्यवस्था
  • वडारांच्या राहत्या वस्तीच्या जागेची मालकी देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT