सालेकसा : पुलाच्या प्रतीक्षेत असलेली बाघ नदी.  
विदर्भ

बाघ नदीला ४० वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; नागरिकांना सात किमीचे अंतर गाठण्यासाठी १५ किमीचा फेरा

यशवंत शेंडे

सालेकसा (जि. गोंदिया) : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल सालेकसा तालुक्‍यात अजूनही विकासाची गंगा पोहोचली नसल्याचे दिसून येते. गेल्या ४० वर्षांपासून बोदलबोडीजवळच्या बाघ नदीवर पुलाचे बांधकाम झाले नाही.

त्यामुळे बोदलबोडी व परिसरातील नागरिकांना अंजोरा, आमगाव हे सात किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी १५ किलोमीटरचा फेरा गाठावा लागत आहे. हा फेरा गाठण्यात नागरिकांचा श्रम व पैसा खर्च होत आहे.

बोदलबोडी मार्गावर वाहतूक अधिक असल्याने बोदलबोडी ते भजेपार मार्गावरील बाघ नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून परिसरातील नागरिकांनी केली होती. मागे याच मागणीला घेऊन दरवर्षी परिसरातील लोकप्रतिनिधी पूल बांधकामाचे आश्‍वासन देत होते. मात्र, त्यांचे आश्‍वासन अजूनही हवेत विरले आहे.

रस्ता झाला बंद

विशेष म्हणजे, बोदलबोडी या गावाचे प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे असल्याने नागरिकांना शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. भजेपार मार्गावर गेल्या ४ महिन्यांपूर्वी पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, आवागमनासाठी हा रस्ता सध्या बंद आहे.

पुलाचे बांधकाम त्वरित करा

बोदलबोडीपासून ७ किलोमीटर अंतरावर अंजोरा, आमगाव आहे. परंतु, येथे पूल नसल्याने परिसरातील नागरिकांना हे गाव गाठण्यासाठी १५ किलोमीटर अधिक अंतर गाठावे लागत आहे. दरम्यान, संबंधित लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष देऊन बोदलबोडी-भजेपार पुलाचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
बोदलबोडी-भजेपार मार्गावरील बाघ नदी पुलाचे टेंडर झाले नाही. फाइल मंत्रालयात पडून आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले तर, काम सुरू होण्यास विलंब लागणार नाही.
- टी. एस. तुरकर, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया.

(संपादन :  दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT