Wardha News sakal
विदर्भ

Wardha News : बालकांना व्यसनांपासून रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन ;शिक्षण विभागाकडून मॉनिटर, प्रहारी गटांची निर्मिती,शिक्षण आयुक्तांचे निर्देश

व्यसनमुक्तीकरिता अनेक संस्था काम करीत असल्या तरी त्याचा विशेष लाभ होत नसल्याचे पुढे आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नंदोरी (जि. वर्धा) : व्यसनमुक्तीकरिता अनेक संस्था काम करीत असल्या तरी त्याचा विशेष लाभ होत नसल्याचे पुढे आले आहे. यामुळे आता सहावी ते बारावीच्या शाळांमधील बालकांना मादक पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी यांनी एक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची शाळेत अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्तांनी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिले आहेत.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी यांनी लहान बालकांमधील मादक पदार्थ प्रसार आणि अवैध तस्करीसंदर्भात एक संयुक्त आराखडा तयार केला आहे. कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रस्तर ते राज्यस्तर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मादक पदार्थांबाबतही वैज्ञानिक माहिती आणि त्यांचे दुष्परिणाम याबाबत बालकांना माहिती दिल्यास, मादक पदार्थ सेवनाच्या दबावापासून बालकांना परावृत्त करू शकते. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध गटामार्फत मादक पदार्थ प्रसार प्रतिबंधाकरिता कार्यक्रम घेण्यासाठी या समूहांना प्रेरित करणे आवश्यक आहे.

यामध्ये इको क्लब, सांस्कृतिक क्लब, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट अँड गाइड या गटांचे सहकार्य घेणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तंबाखूमुक्त शिक्षण संस्था या उपक्रमामध्ये तंबाखू सेवन प्रतिबंधाकरिता देण्यात आलेल्या सूचनांची शैक्षणिक संस्थेच्या आवारामध्ये अंमलबजावणी करण्यात यावी, शैक्षणिक संस्थेच्या आवारात व शंभर मीटर परिसरात तंबाखू व इतर मादक पदार्थ, तसेच मद्यविक्रीस प्रतिबंध घातला जाईल, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच, याचा अहवाल चार महिन्यांतून एकदा वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात यावा, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

तंबाखू मॉनिटरची निवड करा

शैक्षणिक संस्था स्तरावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी पांच्यामधून तंबाखू मॉनिटर यांची निवड करून शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूमुक्त अभियान राबविणे, तसेच तंबाखूचे दुष्परिणाम याचाबतची जागरुकता आणणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Controversy : अल्पवयीन आरोपीची गाडीला बांधून धिंड काढणे महागात, वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

Chiplun ACB Action : जमिनीच्या फेरफारला मंजुरी देणं भोवलं! 5 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात; कार्यालयातच ACB नं रचला सापळा

'जो करण अर्जुन में हुआ था…' सलमान खानच्या एका डायलॉगने BIGG BOSS 20 बद्दल वाढली उत्सुकता

Marathi News Live Updates : राऊतांनी पोस्ट केला शिंदेंचा फोटो, कायद्यानं खेळ आटोपतोय; राजकीय भूकंपाचे संकेत?

Khelo India Funding: खेलो इंडिया योजनेत राज्यांना प्राधान्य; केंद्र सरकारकडून क्रीडा पायाभूत सुविधांसाठी ५६५ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT