विदर्भ

वर्ध्यात जिल्हा परिषद अध्यक्षांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Center) पदभरतीस शासनाने मंजुरी द्यावी या मागणीसाठी जिल्हापरिषद (Wardha ZP) अध्यक्ष सरिता गाखरे यांनी सोमवार (ता. सात) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत उपाध्यक्ष वैशाली येरावार यांच्यासह भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (wardha zp president protesting at collector office in wardha)

जिल्हयातील नव्याने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदभरतीस शासनाने मंजुरी देण्याची त्यांनी मागणी केली होती. याबाबतचे निवेदन त्यांनी वर्धा दौऱ्यावर आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. कारंजा तालुक्यातील नारा व समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले होते.

या दोन्ही ठिकाणी सुसज्ज अशा इमारती तयार झाल्या आहे. परंतु, प्राथमिक आरोग्य केद्रासाठी पद भरती करण्याकरिता शासन स्तरावरून अद्याप मंजुरी न मिळाल्यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांना कोरोनाच्या महामारीच्या काळात आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी आकृतीबंधानुसार पदे भरण्याकरिता शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाकडे आणि संचालक, आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी व अध्यक्षांच्या स्तरावरुन प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. परंतु, अजूनही कोरोना महामारीच्या काळात सुद्धा पदभरतीच्या अनुषंगाने मंजुरी प्राप्त झालेली नाही. यामुळे या परीसरातील नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असल्यांचा त्यांचा आरोप आहे.

(wardha zp president protesting at collector office in wardha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : पुणे महानगरपालिकेच्या निकालांमध्ये भाजपचे दुसरे पॅनल विजयी

Kolhapur Election Result : ‘नो मेवा, ओन्ली सेवा’ला कोल्हापूरकरांचा ठेंगा! आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज विजयी

Pune Municipal Election Result: राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगताप यांचा भाजपला धक्का, मित्राचा पराभव करत मारली बाजी

Nashik Municipal Election Results 2026 : नाशिक महानगरपालिका निवडणूक मतमोजणीचे पहिले कल समोर; भाजप अन् शिवसेनेची 'इतक्या' जागांवर आघाडी

विराट कोहलीच्या बाबतीत ICC कडून ब्लंडर! चूक वेळीच सुधारली म्हणून घोळ निस्तरला; आपला किंग जगात भारी ठरला...

SCROLL FOR NEXT