file photo 
विदर्भ

सावधान :  मुंबईवरून आलेल्या 'त्या' कुटुंबावर गुन्हा दाखल 

अशोक काटकर

दारव्हा (जि. यवतमाळ) : मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सहा सदस्य खासगी वाहनाने दारव्हा येथे असताना पोलिसांनी त्यांना शहराबाहेरच अडवून क्वारंटाईन केले. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. त्या कुटुंबांचा शहरातील नागरिकांशी संपर्क येऊ नये म्हणून पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. 

दोन किलोमीटर अंतरावर अडविले वाहन 

दारव्हा येथील दोघे भाऊ कामानिमित्त मुंबईला राहात होते. त्यामधील एका भावाचा 10 मे रोजी कोरोनामुळे मुंबईतच मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या कुटुंबातील सहा सदस्य व ड्रायव्हर असे एकूण सात व्यक्ती ई-पास मिळवून वाहनाने मुंबईवरून शनिवारी (ता. 16) तालुक्‍यातील सांगवी चेकपोस्टवर पोहोचले. त्यात मृताचा भाऊ, त्याची पत्नी, दोन मुले, सासू व आई असे सहा व्यक्ती आणि त्या खासगी वाहनाचा ड्रायव्हर अशा सात व्यक्तींचा समावेश होता. ते कुटुंब येथील आपल्या घरी शनिवारी (ता. 16) पोहोचणार असल्याची माहिती ठाणेदार मनोज केदारे यांना आधीच मिळाली होती. त्यांनी त्यांचे वाहन शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर अडविले. त्या वाहनांचे दारव्हा पालिकेच्या अग्निशमन विभागाने निर्जंतुकीकरण केले.

सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

 त्यातील एकाही सदस्याला घरी जाऊ न देता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले. रविवारी (ता. 17) उशिरा रात्री मृताच्या भावाला लक्षणे वाटत असल्याने त्याला यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजच्या विलगिकरण कक्षात भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच ड्रायव्हरसह उर्वरित सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या कुटुंबाचा शहरातील कुणाशीही संपर्क आला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला असून तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे. 
 

'ई-पास' चुकीची 
त्या कुटुंबाने मुंबई ते यवतमाळ अशी ई-पास मुंबईत काढायला पाहिजे होती. ती न काढता यवतमाळ येथून काढलेली चुकीची "ई-पास' त्यांच्याकडे आढळून आली. 'ई-पास'मध्ये नमूद असलेल्या वाहनाशिवाय दुसऱ्याचे वाहनाने त्यांनी प्रवास केल्याचे आढळून आले. शिवाय एकाच गाडीत ड्रायव्हरसह सात व्यक्ती असल्यामुळे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन केले. त्यामुळे त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या सर्वच व्यक्तींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. 
-मनोज केदारे,ठाणेदार, पोलिस स्टेशन, दारव्हा. 
 

राज्यभरात राबवा "यवतमाळ पॅटर्न' 

राज्यभरात कोरोनाबाधीतांची संख्या 33 हजारावर पोहोचली आहे. मृत्यूसंख्या बाराशेच्या वर आहे. राज्यातील इतर भागात रुग्णांची संख्या वाढत असताना यवतमाळात या ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्यभरात यवतमाळ पॅटर्न राबवावा, अशी मागणी नगरसेवक विशाल पावडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT