washim news  sakal
विदर्भ

Washim : शहीद अढागळे आकाशवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिरपूरसह पंचक्रोशीवर शोककळा, लेहमध्ये वाहन दुर्घटनेत आले वीरमरण

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन वाशिम जिल्ह्यातील व मालेगाव तालुक्यातील शिरपूरचे सुपुत्र आकाश काकाराव अढागळे (वय ३१ वर्ष) यांना १० सप्टेंबर रोजी वीरमरण आले . त्यामुळे शिरपूरसह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता.१३) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

८ सप्टेंबर रोजी लेहमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना एका वाहन दुर्घटनेमध्ये मेजर आकाश अढागळे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान ता. १० सप्टेंबर रोजी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. आकाशला लेहच्या लष्करी मुख्यालयात ११ सप्टेंबर रोजी लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव दिल्लीच्या लष्करी मुख्यालयात नेऊन त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मानवंदना देण्यात आली.

विमानाने त्यांचे पार्थिव नागपूरला आणले जाणार आहे. नागपूरवरून ता. १३ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनामधून मालेगाव येथे १३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. मालेगाव येथील अकोला फाट्यावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शिरपूर येथे काहीकाळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आसेगाव रोडवरील क्रीडांगणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरपूरचे पोलिस निरीक्षक इतर कर्मचारी असा मोठा चोख बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान ११ सप्टेंबर रोजी मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी अंतिम संस्काराच्या पूर्वतयारीची पाहणी केली.

४ सप्टेंबर रोजीचा संवाद अखेरचा

मागील चार महिन्यापूर्वी त्यांची लड्डाकच्या लेह येथे पोस्टिंग झाली होती. चार सप्टेंबर रोजी आकाशने आपल्या कुटुंबियांसोबत मोबाईलवरून संवाद साधला होता. येत्या पंधरा दिवसात ते आपल्या गावी परत येणार होते. परंतु १० सप्टेंबर रोजी काळाने त्यांच्यावर झडप घातली. चार सप्टेंबर रोजी कुटुंबीयांसोबत झालेला संवाद त्यांचा अखेरचा ठरला.

कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला

१० सप्टेंबर रोजी कावड मंडळाची मिरवणूक चालू होती. अशातच रात्री १० च्या सुमारास आकाश अढागळे या वीर पुत्रास वीरमरण आल्याची बातमी शिरपुरात पोहचली. एकाएकी वाद्यांचा आवाज बंद झाला. सर्व निःशब्द झाले. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

शहीद आकाशच्या अंत्यदर्शनासाठी शिरपूर येथे मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने शिरपूर येथील संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी

राजकन्या आढागळे, सरपंच शिरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT