बेसा: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर निर्माण झालेली पूरसदृश स्थिती. साचलेल्या पाण्यातून वाहने काढण्याची कसरत करताना वाहनधारक.
बेसा: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर निर्माण झालेली पूरसदृश स्थिती. साचलेल्या पाण्यातून वाहने काढण्याची कसरत करताना वाहनधारक. 
विदर्भ

बेसा येथे जलवाहिनी फुटली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात पाणीटंचाई असताना लागूनच असलेल्या बेसा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने भर उन्हाळ्यात पुरासारखी स्थिती दिसून आली. वाहून जाणारे पाणी बॅंक ऑफ इंडियासह एटीएममध्येही शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जलवाहिनी फुटल्याने दोन दिवस बेसातील हजारो कुटुंबांना पाणी मिळणार नाही.
बेसा येथे रामा डॅम येथून जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही जलवाहिनी टाकली असून आज दुपारी एक वाजताच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या कामासाठी खोदकामादरम्यान ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे खोदकाम करणाऱ्या मजुरांचीही तारांबळ उडाली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ पाणी वाहून गेले. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर पाणी जमा झाले. मोठ्या प्रमाणात वाहून गेलेले पाणी बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयासह एटीएममध्येही शिरले. त्यामुळे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली. रस्त्यांवरही पूरस्थिती दिसून आली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. पाइपलाइन फुटल्याने जलकुंभातही पाणी जमा न झाल्याने पुढील दोन दिवस बेसातील हजारो कुटुंबांना पाणी मिळणार नसल्याचे सरपंच सुरेंद्र बानाईत यांनी सांगितले. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुरुस्तीची कामे सुरू केली. उशिरा रात्रीपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राजेश कानडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT