Water Shortage esakal
विदर्भ

Water Shortage : वर्धा जिल्ह्यातील ३८८ गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर?

उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये जलसंकट उद् भवण्याचा अंदाज पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वर्धा - उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये जलसंकट उद् भवण्याचा अंदाज पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे. उद् भवणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती प्रारूप आराखडा तयार केला आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १५ गावांतील १५ खासगी विहिरी यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शिवाय विविध विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधितांना पाठविण्यात आले आहे.

यंदा या गावातील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रारूप कृती आराखडा तयार करून तो मंजूरही करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत ७२७ कामे प्रस्तावित आहेत. खासगी विहिरींचे अधिग्रहण, नवीन बोअरवेल, बोअरवेल दुरुस्ती, विहिरींचे खोलीकरण आदी कामे जलसंकटावर मात करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

मे व जून महिन्यात जलसंकट उग्ररूप धारण करेल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने उपाययोजना प्रस्तावित आहेत. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण यंत्रणा व्यस्त राहिल्याने उपाययोजनांची कामे प्रलंबित होती. तर आता मतदान प्रक्रिया पार पडल्याने उपाययोजनांच्या कामांना गती दिली जाणार आहे.

आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांतील काही गावांत नागरिकांना जलसंकटांना तोंड द्यावे लागत आहे. जलसंकटावर मात करण्यासाठी १५ गावांमधील १५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये वर्धा तालुक्यातील दहेगाव (मिस्कीन). बेलगाव, सालोड (हिरापूर), वायगाव (निपाणी), कारंजा (घाडगे) तालुक्यातील येनगाव, उमरी, खरसखांडा, धर्ती, चंदेवाणी, सुसुंद, पिपरी, सारवाडीसह तीन गावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT