जामली : पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला हवी नवीन डीपी sakal
विदर्भ

जामली : पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला हवी नवीन डीपी

एकझिरा ग्रामपंचायतीचे वीज वितरण कंपनीला पत्र

मोहन गायन

जामली : चिखलदरा तालुक्यातील एकझिरा गावाला नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ‘सकाळ’ने हा मुद्दा उचलून धरल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेतली असून, नव्या डीपीच्या मागणीने आता जोर धरला आहे. वीज वितरण कंपनीला पत्र लिहून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ नवीन डीपी बसविण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आदिवासी बांधवांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

एकझिरा गावाची लोकसंख्या १५०० च्या जवळपास आहे. या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटार व स्ट्रीट लाइट तसेच गावातील विद्युत पुरवठा केबलमधून असून ते जळलेले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा दोन-दोन महिन्यांच्या अंतराने खंडित होतो. एप्रिलपासून आजपर्यंत चार वेळा मोटार जळली. त्यामुळे गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. येथील महिलांना रात्रीच्या अंधरात पाणी भरावे लागते.

त्यामुळे विद्युत विभागाने नवीन थ्रीफेज पुरवठा करणारे केबल व नवीन डीपी देण्याची विनंती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीला केली. विशेष म्हणजे मेळघाटच्या अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न केवळ उन्हाळाच नव्हे तर वर्षभरच असतो. त्यासाठी काही तांत्रिक कारणे असून, ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली लोकप्रतिनिधी, प्रशासन किंवा शासनाकडून होताना दिसत नाहीत.

"एकझिरा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारला कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने वारंवार मोटार जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याकरिता वीज वितरण कंपनीने येथे नवीन डीपी व थ्रीफेज सप्लाय करणारे केबल लावावे, जेणेकरून मोटार नेहमी जळणार नाही व गावकऱ्यांना पाणीटंचाईपासून मुक्ती मिळेल."

-विलास पाचघरे, सचिव, एकझिरा ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT