weapons of nearby three lakh rupees worth seized in amravati 
विदर्भ

अमरावतीमध्ये सव्वातीन लाखांचे शस्त्र जप्त, पाच जणांना अटक

संतोष ताकपिरे

अमरावती : शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दोन आठवड्यांत गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सहा देशी बनावटीचे कट्टे आणि 26 काडतुसे जप्त केली. त्यात एकूण पाच जणांना आतापर्यंत अटक झाली. जप्त शस्त्रे ही 3 लाख 18 हजार रुपये किंमतीची आहेत. 

मंगळवारी (ता. 30) रात्रीच्या सुमारास नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीतून संशयित आरोपी अकीब हुसेन अख्तर हुसेन (वय 23, रा. अलमासनगर, जुनीवस्ती, बडनेरा) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी बनावटीचा एक कट्टा आणि तीन जिवंत काडतुसेही जप्त केली. जप्त शस्त्रे आणि काडतुसे 38 हजार रुपये किंमतीची आहेत. यापूर्वी 13 मार्च 2021 ला सय्यद वसीम सय्यद नूर (वय 26, रा. फरीदनगर) याला अटक करून एक देशीकट्टा आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली होती. 22 मार्च रोजी शेख समीर मौलाना शेख अफसर (वय 25) व मोहंमद अवेस मोहंमद लतिफ (वय 21, दोघेही रा. गौसनगर, अमरावती) यांच्या ताब्यातून तीन देशीकट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. मो. असिम ऊर्फ लड्डू मोहंमद इद्रिस (वय 30, पॅराडाइज कॉलनी) याला अटक करून एक कट्टा आणि तीन काडतुसे जप्त केली होती. 

मध्य प्रदेशसोबत तार जुळलेले -
अवैध अग्निशस्त्रे बाळगून बरेच जण भाईगिरीच्या नादात अडकले. ही अग्निशस्त्रे मध्य प्रदेशच्या पाचोरा येथून आणल्या जात असल्याची माहिती आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : नाशकात स्वतःच्या घरात भाजपचे ४ तिकीट घेणाऱ्या सुधाकर बडगुजरांना मोठा धक्का

Kolhapur Election Result : ‘नो मेवा, ओन्ली सेवा’ला कोल्हापूरकरांचा ठेंगा! आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज विजयी

Pune Municipal Election Result: राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगताप यांचा भाजपला धक्का, मित्राचा पराभव करत मारली बाजी

Nashik Municipal Election Results 2026 : नाशिक महानगरपालिका निवडणूक मतमोजणीचे पहिले कल समोर; भाजप अन् शिवसेनेची 'इतक्या' जागांवर आघाडी

विराट कोहलीच्या बाबतीत ICC कडून ब्लंडर! चूक वेळीच सुधारली म्हणून घोळ निस्तरला; आपला किंग जगात भारी ठरला...

SCROLL FOR NEXT