weather update rain forecast heavy rain in Vidarbha sakal
विदर्भ

Weather Update : विदर्भात अतिवृष्टीची शक्यता; आंतरराष्ट्रीय हवामान संकेतस्थळाने वर्तविला अंदाज

बंगालच्या उपसागरात लवकरच तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे येत्या मंगळवारपासून संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीची दाट शक्यता

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बंगालच्या उपसागरात लवकरच तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे येत्या मंगळवारपासून संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. तसा इशारा हवामानाविषयीचे भाकीत वर्तविणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांनी दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, विंडी डॉट कॉमसह स्कायमेट व ॲक्युवेदर या आंतरराष्ट्रीय हवामान संकेतस्थळांनी येत्या ९ ते १३ जुलैदरम्यान नागपूरसह संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. यासंदर्भात सोनेगाव येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी याविषयी सध्या तरी निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही केवळ ‘मिडियम रेंज फोरकास्ट’ अर्थात पाच दिवसांचा अंदाज व्यक्त करीत असतो.

त्यामुळे पुढील पाच दिवसांत पाऊस येईल की नाही, एवढेच सांगू शकतो. सध्या आम्ही सात जुलैपर्यंत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर नेमकी काय स्थिती राहील, हे सध्यातरी सांगणे अवघड आहे. यासंदर्भात दोन ते तीन दिवसांनंतरच ठामपणे भाकीत वर्तविता येईल. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे त्यांनी अवश्य सांगितले. अतिवृष्टीचा हा इशारा शेतकऱ्यांची निश्चितच डोकेदुखी ठरणार आहे. जुलै महिन्यात विक्रमी पाऊस पडल्याने बळीराजा तसाही चिंतीत आहे. काही दिवसांचा अपवाद वगळता जवळपास संपूर्ण महिनाभर वरुणराजा ‘जम के’ बरसला.

मागील तीन-चार दिवसांपासून उघडीप दिल्याने पीक परिस्थिती सुधारत चालली आहे. शिवाय डवरणी, निंदन, खुरपणीसह खोळंबलेल्या अन्य कामांनाही वेग आला आहे. जुलैतील पावसामुळे जमीनीत अजूनही पाणी साचलेले असून, शेतमालांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या निमित्ताने त्यांच्यासमोर आणखी एक अस्मानी संकट उभे ठाकणार आहे. अतिवृष्टीची दाट शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी सतर्क राहून, कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

अतिवृष्टीचा नवा इशारा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच धोक्याची घंटी आहे. जुलैमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यातून पूर्णपणे सावरत नाही तोच हे नवे संकट उभे ठाकले आहे.

-अमिताभ पावडे, शेती अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! डॉक्टरला मागितली ५० लाखांची खंडणी,अत्‍याचाराच्‍या तक्रारीने म्हसवडला खंडणीचा कट, सातारा जिल्ह्यात खळबळ

Family Planning : कुटुंब नियोजनात ‘छाया’, ‘अंतरा’ गोळ्यांचा वापर; पुरुष नसबंदीला प्रतिसाद अत्यल्प

सोलापूरला दररोज पाणीपुरवठा! नव्याने टाकली जाणार ७१५ किमी पाइपलाइन; १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ; ८९२ कोटींपैकी २०० कोटी रोख्यातून उभारले जाणार

Morning Breakfast Recipe: हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात मुलांसाठी बनवा 'हे' 2 इन्स्टंट पदार्थ, लगेच नोट करा रेसिपी

संचमान्यतेपूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी! मधूनच शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांची होणार पडताळणी; इयत्ता अकरावी-बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

SCROLL FOR NEXT