File photo 
विदर्भ

तणनाशकाचा कपाशीवर वरवंटा

सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी(चंद्रपूर) : यंदा दमदार पाऊस झाला. कपाशीच रोपही चांगली फुलली. त्यामुळे नव्या आशेने बळीराजा कामाला लागला. कपाशीच्या पिकात तण वाढले. ते मारण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केली .पण उलटच झाल.शेकडो हेक्‍टर पिकातील पीक पूर्णपणे नष्ट झाले. या नव्या संकटाचा सामना करण्यासाठी आता शेतातील,प्रत्येक झाडावर प्लास्टिक झाकून फवारणी केली जात आहे
नगदी पीक म्हणून शेतकरी कपाशीच पीक मोठया प्रमाणात घेतात. विशेषतः: गोंडपिपरी तालुक्‍यात कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षी पावसाने सरासरी बऱ्यापैकी गाठली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पिकाची अपेक्षा आहे. पावसाने कपाशीही बहरली. शेतात डौलदार कपाशीने बळीराजा समाधानी झाला आहे. मात्र आता नवे संकट उभे ठाकले आहे. कपाशीच्या पिकात तण वाढले आहे. मजुरी वाढल्याने तण काढण्यासाठी मजुर लावणे शेतकऱ्यांना परवडत नाही. आता बाजारात वेगवेगळी तणनाशकही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. यातीलच काही तणनाशकांची फवारणी शेतकऱ्यांनी केली. मात्र झाले उलटेच.
तालुक्‍यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी अक्षरशः: नष्ट झाली. एका शेतकऱ्याने पाच एकर शेतीवर ट्रॅक्‍टर फिरविला. फवारणीमुळे तणासोबतच कपाशीचे पीक धोक्‍यात येत असल्याची वार्ता गावा-गावात पोहचली . त्यामुळे शेतकरीही धास्तावले आहे. शेतात तण वाढले. त्याचा कपाशीला फटका. दुसरीकडे तणनाशक कपाशीवर उठले आहे. अशा दुहेरी मनस्थितीत शेतकरी आहे. काहींनी आता पुन्हा मजुरांचा पर्याय निवडला आहे. त्यांच्यामार्फतीने तण काढले जात आहे. काहींनी त्यातूनही मार्ग काढला. तणनाशक फवारणीचे दूष्परिणाम होऊ नये यासाठी कपाशीवर प्लास्टिक लावले जात आहे. त्यानंतरच फवारणी करणे सुरू आहे. या मार्गाचा अनेक शेतकऱ्यांनी अवलंब केला आहे. फुललेली कपाशी वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे. निसर्गाची कृपादृष्टी यावर्षी असली तरी बळीराजा समोर नव्या संकटाची मालिका उभी होत आहे.


पीक वाचविण्यासाठी बळीराजांची धावपळ सुरू आहे. तण नाशकामुळे फवारणीमुळे पीक नष्ट झाल्याची धास्ती अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे शेतातील प्रत्येक झाडांवर प्लास्टिक झाकून फवारणी सुरू आहे.
अरुण वासलवार,
गोंडपिपरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT