भामरागड : तिरंगा यात्रेत सहभागी नागरिक.
भामरागड : तिरंगा यात्रेत सहभागी नागरिक.  
विदर्भ

म्हणून काढली "संविधान तिरंगा यात्रा...

सकाळ वृत्तसेवा

भामरागड (जि. गडचिरोली) : नागरिकांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व कळावे तसेच संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जन संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (ता. 26) आलापल्ली ते लाहेरी "संविधान तिरंगा यात्रा' काढण्यात आली.

अतिदुर्गम तथा नक्षलग्रस्त भामरागड तालुक्‍यांत राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

यांचे लाभले नेतृत्व

जनसंघर्ष समिती नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात निघालेल्या "संविधान तिरंगा यात्रे'त कॅ. स्मिता गायकवाड, रितेश बडवाईक, डॉ. श्रुती अष्टणकर, उडान फाउंडेशनचे रमेश दलाई, रवी नीलकुद्री, प्रशांत मित्रावार, संदेश लोधी, पंकज दुर्वे, अभिषेक सावरकर, गोलू ठाकरे, बरखा बडवाईक, प्रशांत शेंडे, रोशन ताईकर, शैलेश बामुलकर, आयुष्य दुबे, नीलेश गोमासे, आशीष चौधरी, लोही, अभिजित डायगने, महेश ढोबळे, मारुती मज्जी सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याचे महत्त्व कळावे

जन संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के म्हणाले, नव्या पिढीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी कवडीचीदेखील किंमत मोजली नाही. फुकटात वाटेला आलेले स्वातंत्र्य कित्येक हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाले आहे. देशाच्या या सर्वोत्तम उत्सवात भामरागडसारख्या दुर्गम भागातील लोकांना सहभागी करून त्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळावे, हा आमचा हेतू होता.

जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी

शहरी भागात मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताकदिनाचा जल्लोष असतो; परंतु दुर्गम गावांमध्ये नागरिक या उत्सवापासून दूर असतात. त्यामुळे त्यांच्यात जागृती तसेच नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी जन संघर्ष समितीने पुढाकार घेऊन लोकांना "संविधान तिरंगा यात्रे'चे महत्त्व पटवून दिले.

संविधान पुस्तिकेचे वाटप

भामरागड येथील बाजार चौकात स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजता यात्रा पोहोचताच नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी तिरंग्याचे पूजन करून उपस्थितांना जन संघर्ष समितीच्या वतीने संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी सामूहिक राष्ट्रगीतासोबतच संविधानाचा अधिकार व कर्तव्य, याचे सामूहिक वाचन करण्यात आले. लाहेरीतही मोठ्या उत्साहात तिरंगा यात्रेचे स्वागत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT