file photo 
विदर्भ

काय? पूरक आहाराचा भार मुख्याध्यापकांवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दुष्काळग्रस्त गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिन्यांपासून शाळांना उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा खर्च मुख्याध्यापकांना करावा लागत असल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे.
सरकारने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त गावातील शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत नाहीत म्हणून शाळा सुरू झाल्यानंतर नियमित पोषण आहारासोबत आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांना दूध, फळे व अंडी असा पूरक आहार देण्यात येतो. यासाठी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी पाच रुपये एवढे अनुदान देय आहे.
नागपूर जिल्ह्यात पंचायत समिती हिंगणा, उमरेड, कळमेश्‍वर व काटोलमधील काही गावातील शाळांमध्ये ही योजना राबविली जात आहे. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला. परंतु, या योजनेचे एक रुपया अनुदान अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही. योजनेचा निधी सरकारकडून जिल्हा परिषद स्तरावर बऱ्याच दिवसांपूर्वीच उपलब्ध करून दिल्याची माहिती सूत्राने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT