What a Government! Wine shops open, Tea shops closed! 
विदर्भ

...अजब तुझे सरकार! दारूला होकार, मात्र चहाला नकार!

सकाळ वृत्तसेवा

वरठी (जि. भंडारा) : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने लॉकडाउन घोषित केले. तेव्हापासून आजतागायत चहाच्या टपऱ्यांना कुलूप आहे. दरम्यान, शिथिलता मिळताच बाजारपेठ खुली झाली. जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय इतर दुकाने सुरू झाली. दारूची दुकानेही उघडली. मात्र, चहाची दुकाने अद्याप टाळेबंद आहेत. तब्बल दोन महिन्यांपासून रोजगाराचे साधन हिरावल्याने नागरिकांना चहाचा घोट देणाऱ्या विक्रेत्यांवर विषाचा घोट घेण्याची वेळ आली आहे. "चाय पे चर्चा' करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची व्यथा दूर करावी, अशी या चहा दुकानदारांची मागणी आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागात पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो व्यक्तींनी कमी खर्चात उभारता येणारा व्यवसाय म्हणून चहापानाच्या टपऱ्या सुरू केल्या. परंतु, गेल्या दोन महिन्यांत चहा व पानटपरीचालकांच्या व्यवसायाला लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. दीर्घ काळापासून व्यवसाय पूर्णपणे कुलूपबंद झाल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. लॉकडाउनमधून सवलत मिळताच ठराविक वेळेत हार्डवेअर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, स्टेशनरी, मोबाईल आणि इतर दुकाने व आता सलूनची दुकानेही सुरू झालीत. बससेवा सुरू झाली असून 1 जूनपासून रेल्वे सुद्धा सुरू होणार आहे. मात्र, हे निर्बंध चहा विक्रेत्यांवरच का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

रोजीरोटीचा प्रश्‍न झाला बिकट

आजवर होती नव्हती तितकी मिळत घरबसल्या खर्च झाली. पुढचे दिवस कसे काढावे हाच विचार त्यांच्यासमोर आहे. वरठी बसस्थानक, रेल्वे स्थानकाजवळील चहा व पानटपऱ्या अजूनही कुलूपबंद
आहेत. त्यामुळे रोज कमावून संसाराचा गाडा हाकणाऱ्या व्यावसायिकांसमोर आता जगायचे कसे, असा प्रश्‍न आहे. इतर व्यावसायिकांकडून सुरक्षित अंतराची व आवश्‍यक काळजी घेण्याची हमी घेऊन परवानगी देण्यात आली. मग याच अटी लागू करून आम्हालासुद्धा चहा, पान विकण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. सरकार एकीकडे महसूल कमाविण्यासाठी दारूच्या दुकानांना परवानगी देते. मात्र, ज्यांचे पोट या व्यवसायावर अवलंबून आहे, त्यांना चहा विकण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

चहा विक्रीचा व्यवसाय हे माझ्या उत्पन्नाचे एकमात्र साधन आहे. दिवसभर विकलेल्या चहाच्या पैशातून 3 व्यक्तींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मीच घरातील कमावता व्यक्ती आहे. तीन महिन्यांपासून चहाचे दुकान बंद आहे. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.
-निखिल डोंगरे,
चहा विक्रेता वरठी.

गेल्या तीन महिन्यापासून माझे दुकान बंद आहे. यादरम्यान इतर काम शोधायचा प्रयत्न केला मात्र, अशा परिस्थितीमध्ये तेही मिळाले नाही. त्यामुळे, कुटुंबीयांचे पोट कसे भरावे हा प्रश्न आहे. या सर्व विचारांमुळे मानसिक दडपण येत आहे.
-मुकेश तिजारे, चहा विक्रेता वरठी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT