Ganpati Viserjan  sakal
विदर्भ

Ganpati Viserjan : मिरवणूक दुर्घटनेतील पीडित ‘लाडक्या बहिणीं’चे काय? पोलिस अधीक्षक व राजकीय नेत्यांची रुग्णालयात भेट

Ganpati Viserjan : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाका दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलांची रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिस अधीक्षक आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटी देऊन त्यांची विचारपूस केली.

सकाळ वृत्तसेवा

उमरेड : रात्री साडेनऊ सुमारास शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या फटाका दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलांपैकी काही महिला या नागपूरच्या सक्करदरा परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

पोलिस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन पीडित महिलांची भेट घेत विचारपूस केली, तसेच उपविभागीय अधिकारी विज्ञासागर चव्हाण, नायब तहसीलदार प्रदीप वरपे, माजी आमदार राजू पारवे व सुधीर पारवे यांनी देखील रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या महिलांचे क्षेमकुशल जाणून घेतले.

ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्याच ठिकाणी कापड व्यापाऱ्यांची मोठी दुकाने आहेत, जर त्या फटाक्याच्या स्फ़ोटाचे निखारे त्या दुकानात पोहचले असते तर मोठा अनर्थ घडला असता, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

शनिवारी (ता.२१)‘सकाळ’च्या बातमीदाराने नागपूरच्या सक्करदरा येथील रूग्णालयाला भेट दिली असता डॉ.आशिष पोंगडे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या रुग्णालयात एकूण ५ महिलांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ महिला या अतिदक्षता विभागात , तर अन्य दोन जनरल वॉर्डात उपचार घेत होत्या.

सर्व महिला रुग्णांचे चेहरे व मानेच्या भोवताल भाजले असून आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. आयसीयुमधील तिन्ही रुग्ण व अन्य एक महिला अश्या चार महिला रुग्ण जनरल वॉर्डला स्थलांतरित करण्यात आले असून एक महिलेला सुट्टी दिली. आता उपचार घेत असलेल्या चार महिला लवकरच बऱ्या होतील व त्यांच्या घरी जाऊ शकतील.

तहसीलदारांनी गणपतीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीला परवानगी दिली होती. मात्र कुठल्याही प्रकारच्या ‘फायरशो’ची व मोठ्या प्रमाणात फाटक्यांची आतशबाजी करण्याची परवानगी दिली नव्हती. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोषी असणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढे चौकशीत जर मंडळाकडून नियंभंग केले असल्याचे निष्पन्न झाले तर त्या पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल.

-विज्ञासागर चव्हाण, उपविभागीय अधिकारी, उमरेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT