file photo 
विदर्भ

असे काय झाले की, सुशिक्षित तरुणांवर वाढतोय कर्जाचा डोंगर 

कृष्णा लोखंडे

अमरावती : गरीब असो वा श्रीमंत किंवा गर्भश्रीमंत सर्वांच्याच आवडीच्या चहाचे नामांकित ब्रॅण्ड बाजारात आले. सुशिक्षित तरुणांनी नोकरी मिळत नसल्याने चहाविक्रीचा व्यवसाय निवडला. लाखो रुपयांची गुंतवणूक करीत दुकाने थाटली. मात्र, कोरोनाच्या संक्रमणाने या दुकानांना टाळे लागले. त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

सर्वसामांन्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलेल्या चहाचे बाजारात अनेक नामांक्रित ब्रॅण्ड आल्याने या व्यवसायाला प्रतिष्ठाही मिळाली. एरवी टपरीवर मिळणारा चहा सुशोभित दुकानांमधून विकल्या जाऊ लागला. शेकडो तरुणांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनलेल्या या व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागले व गेल्या चार महिन्यांपासून हा व्यवसाय अनिश्‍चिततेच्या गर्तेत अडकला आहे. बॅंकांकडून कर्ज घेत व्यवसाय करणाऱ्या तरुणांवर हप्ते भरण्यासोबतच दुकानाचे भाडे व कामगारांचे वेतन करताना स्वतः मात्र बेरोजगार होण्याची वेळ आली. मार्चच्या तिसऱ्या सप्ताहात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन लागू झाले. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी या दुकानांचे शटर डाऊन करायला लावून लॉक लावण्यास भाग पाडले व लाखो रुपये कर्ज काढून व्यवसाय थाटणाऱ्या सुशिक्षित तरुणांवरील कर्जाचा बोझा वाढू लागला आहे. प्रशासनाने चहाविक्रीवर निर्बंध लादल्याने या व्यावसायिकांची कोंडी मात्र झाली आहे. पदरचा जमा पैसा बॅंकेचे व्याज भरण्यात व दुकानाचे भाडे भरण्यात खर्च होत आहे. 

मालमत्ता गहाण ठेवून कर्ज 
ब्रॅण्डखाली चहाविक्रीचा व्यवसाय सुरू करणाऱ्या हार्दिक देशमुख या सुशिक्षित तरुणाने बॅंकेतून मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले. पाच मार्चला राजापेठ परिसरात तीस हजार रुपये महिना भाड्याने दुकान घेत चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला. फ्रेन्चाईसी मिळविण्यासाठी त्याने दोन लाख रुपये भरले. अनलॉकमध्ये अजूनही दुकान सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. 

कर्जाचा डोंगर वाढला 
सतीश करेसिया यांनी एका ब्रॅण्डची फ्रेन्चाईसी घेऊन दोनशे चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानातून व्यवसाय सुरू केला. तो आता बंद पडला आहे. व्यवयाय बंद पडल्याने कर्ज वाढत असून प्रशासनाने कोरोना नियमांच्या अधीन चहाविक्रीस परवानगी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. 

आमच्यावरच अन्याय का? 
समीर पाटील यांचीही स्थिती यापेक्षा फार वेगळी नाही. बॅंकांचे हप्ते कसे फेडावे, अशी चिंता त्यांना लागली आहे. याशिवाय दुकानांचे भाडे वसूल करण्यासाठी घरमालक दारात उभा राहत असून कामगारांचे वेतन सुरूच आहे. हॉटेल व रेस्टॉरंट यांना पार्सल देण्याची परवानगी दिल्या गेली, चहाटपऱ्याही सुरू झाल्यात, मात्र आम्हाला मनाई आहे, हा अन्याय असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT