file photo 
विदर्भ

क्या बात है ! -वर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये पसंती 

रूपेश खैरी

वर्धा : स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्त्वाचे शस्त्र ठरलेल्या महात्मा गांधी यांच्या खादीचे आज महत्त्व वाढले आहे. खादी कापड वस्त्र म्हणून तर सातासमुद्रापलीकडे पोहोचले होते. आता खादी मास्क म्हणून इंग्लंडमध्ये पोहोचले. वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहे. 
मार्च महिन्यात भारतात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि लगेच वाढलेली धावपळ सर्वांनाच भयभीत करणारी होती. लॉकडाउन घोषित होताच मास्कचे महत्त्वही वाढले. याच मास्कचा व्यापार गरम झाला. या व्यापारात वर्ध्याच्या ग्रामसेवा मंडळाने उडी घेतली. त्यांची ही उडी थेट सातासमुद्रापार पोहोचली. गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल आणखी पुढे जात अस्सल सेंद्रिय कापसाच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंड मधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना हे मास्क पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला पडले. सध्या त्यांच्याकडून एक हजार मास्कचा ऑर्डर मिळाला आहे. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत आहे. कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी खादी इंग्लंडमध्ये पसंतीला उतरली आहे

एक हजार मास्कची मिळाली ऑर्डर 
ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीचे तयार केलेले मास्क इंग्लंडच्या बाजारात पोहोचले आहे. सातासमुद्रापार पोहोचलेल्या या सेंद्रिय मास्कने विदेशातही खादीचे गुणगान केले. १९३४ मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली होती.  इथं कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जात आहे. जवळपास एक महिना त्यावर बारीक काम केल्यावर मास्क पाठविण्यात आले आहे. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली आहे. हे मास्क श्‍वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही.  निर्जंतुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुऊन वापरता येतात.


हा मास्क दिलेल्या मापातच तंतोतंत शिवावा लागतो. थ्री लेअर मास्क धुऊन वापरता येतो.  एक मास्क शिवायला जवळपास २० ते ३० मिनिट लागतात. रोजगार गमावलेल्या काळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे. ग्रामीण भागात आता खादी मोठे रोजगाराचे साधन बनले आहे.
- करुणा फुटाणे, अध्यक्ष, ग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT