File photo
File photo 
विदर्भ

वाघाची वाढलेली नखे, दात जातात कुठे?

राजेश प्रायकर

वाघाची वाढलेली नखे, दात जातात कुठे?
नागपूर : वाघांच्या प्रत्येकच अवयवाला बाजारात मोठी किंमत आहे. महाराजबागेत अनेक वाघ, बिबट व इतर प्राणी अनेक वर्षे राहतात. या काळात नैसर्गिक प्रक्रियेनुसार त्यांची नखे वाढतात, गळून पडतात. वय झाल्यानंतर त्यांचे दातही पडतात. मात्र, ते कुठे जातात, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ त्याचे काय करते? याबाबत गेली अनेक वर्षे हिशेबच नसल्याचे सूत्राने नमूद केले.
वाघांच्या अवयवांसाठी विदर्भ, विशेषतः नागपूर नेहमीच चर्चेत असते. कधी शिकार करून तर कधी नैसर्गिक मृत्यू झालेल्या वाघांची अवयवे अनेकदा वनविभागाने त्याचा व्यवसाय करणाऱ्यांकडून हस्तगत करीत कारवाई केली. महाराजबागेतही गेली अनेक वर्षे वाघ, बिबट, अस्वल व इतर वन्यप्राणी पर्यटकांसाठी आणण्यात आले आहेत. हे वन्यप्राणी अनेक वर्षे महाराजबागेत आहेत. या काळात या प्राण्यांची नखेही वाढतात. विशेषतः वाघांच्या नखांना मोठी मागणी आहेत. याशिवाय वयाच्या एका टप्प्यावर दातही गळून पडतात. महाराजबागेतील वाघ व इतर प्राण्याचे नैसर्गिकरित्या गळून पडणारे नख, दात जातात कुठे? हा नागपूरकरांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक वाघ महाराजबागेत आले. काहींचे नैसर्गिक मृत्यू झाले. यावर्षी मार्चमध्ये जाई या वाघिणीचा व त्यापूर्वी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जुई या वाघिणीचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूपूर्वीही वयानुसार नैसर्गिकरित्या नख, दात याच परिसरात पडतात. नियमानुसार वाघांची अवयवे जाळून नष्ट करणे अपेक्षित आहे. परंतु, महाराजबागेत कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून ही प्रक्रिया कितपत होते? याबाबत वन्यप्राणीप्रेमीही शंका व्यक्त करीत आहेत. बाजारात वाघांच्या एका पंजाची किंमत 27 हजार रुपये असून या वाघनखांचा वापर अनिद्रा तसेच इतर मानसिक आजारांवर उपचारासाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये केला जात असल्याचे सूत्राने नमूद केले.
वन्यप्राण्यांच्या बाजूलाच "प्ले-ग्राउंड'
प्राणिसंग्रहालयात प्ले-ग्राउंडमुळे पशुपक्षी व वन्यप्राण्यांना त्रास होतो. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात प्ले-गाउंड नको, असा सेंट्रल झू ऍथॉरिटीचा नियमच आहे. परंतु, या नियमाकडे डोळेझाक करीत महाराजबागेत वाघाच्या व पक्ष्यांच्या रहिवासी क्षेत्राजवळच लहान मुलांसाठी प्ले-ग्राउंड तयार केले आहे. प्राण्यांच्याच आकर्षणाने लहान मुले, पालकांसह येतात. त्यामुळे प्ले-गाउंडची गरजच काय? असा सवालही काही नागरिकांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT