kapus online 
विदर्भ

पांढऱ्या सोन्याची कवडीमोल किमतीत बोळवण

एकनाथ अवचार

नांदुरा (जि. बुलडाणा) : नांदुरा तालुक्याला कॉटनबेल्टची किनार लाभली असून, येथील दर्जेदार कापसाला लांब धाग्यामुळे नेहमी झळाळी मिळत आली असली तरी यावर्षीच्या ऐन कापूस वेचणीच्या काळात पावसाने थैमान घातल्याने कापसाची प्रत घसरली आहे. सुरुवातीपासूनच भाव पाच हजाराच्या आसपास स्थिर राहिले आहेत. कापसाला झळाळी नक्कीच मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मार्च महिना येईपर्यंत वाट पाहिली. तरीही भाव न वाढता कमी होत असल्याने बळीराजा संकटात सापडला असून, अजून भावात घसरण होऊ नये म्हणून साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटलने कापूस विकल्या जात आहे.

शेतकरी सापडला संकटात
नांदुरा तालुक्यात खरीप हंगामात यावर्षी सर्वाधिक जवळपास 19 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे बागायती कपाशी केव्हाचीच संपुष्टात आल्याने कोरडवाहू कापसाची यावर्षी लागवड शेतकऱ्यांनी केली असता सततचा पाऊस उत्पादन घटीला कारणीभूत ठरत असताना दिवाळीच्या पूर्वसंध्येवर पावसाचे ऐन कापूस वेचणीकाळात आगमन झाल्याने हा कापूस पूर्णतः भीजल्याने अगोदरच प्रतवारीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नंतरचा कापूस चांगला आला असला तरी प्रतवारीच्या कारणातून व्यापाऱ्यांनी होईल तसे शेतकऱ्यांना त्याच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत भावात लुटले आहे. गेल्या चार-पाच महिन्यात कापसाचे दर हे चार हजार 800 ते पाच हजार 200 वर स्थिर राहिल्याने दरवर्षीच्या अनुभवातून मार्च महिन्यात तरी वाढतील ही अपेक्षा ठेवली असतानाच भाव तर वाढलेच नाही, उलट यात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी घसरलेल्या भावाच्या संकटात आता सापडला आहे.

सात हजार प्रती क्विंटल भाव द्यावा
यावर्षी अगोदरच कापूस नाही, त्‍यातच मजुरीचे दर व उत्‍पादन खर्च पकडला तर जवळपास शेतकऱ्याच्‍या घरातून पैसे खर्च करावे लागणार अशी परिस्‍थिती आजचे कापसाचे भाव पाहून कळत आहे. यासाठी शासनाने प्रति एकर १० हजार रुपये लागलेली मजुरी म्‍हणून मदत देत कापसाला कमीत कमी ७ हजार रुपये प्रती क्‍विंटलचा हमीभाव जाहीर करून त्‍याची खरेदी करावी. तरच शेतकरी या संकटातून जगेल.
-बाळकृष्ण पाटील, शेतकरी कंडारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT